Join us  

सोन्याच्या आयातीमध्ये दुपटीहून वाढ; नऊ महिन्यांमधील स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 5:47 AM

मागणी मोठी असल्याचा परिणाम

नवी दिल्ली : देशामधील सोन्याची मागणी सातत्याने वाढत असल्यामुळे चालू आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत सोन्याची आयात दुपटीहून अधिक झाल्याचे वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. यंदा ३८ अब्ज डॉलरहून अधिक मूल्याच्या सोन्याची देशामध्ये आयात झाली आहे.देशामध्ये सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे देशाच्या व्यापारातील तोट्यामध्ये वाढ होत असते. सरकार देशातील सोन्याची आयात कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, नागरिकांनी सोने खरेदी करणे सुरूच ठेवले असल्याचे आढळून येत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये ३८ अब्ज डॉलरच्या सोन्याची आयात झाली आहे. मागील वर्षाच्या याच कालावधीमध्ये १६.७८ अब्ज डॉलरच्या सोन्याची आयात झाली होती. या कालावधीमध्ये देशातील चांदीच्या आयातीमध्येही वाढ होऊन ती २ अब्ज डॉलरवर पाेहोचली आहे. मागील वर्षाच्या याच कालावधीमध्ये  ७६.२ कोटी डॉलर मूल्याच्या चांदीची आयात झाली होती. भारत हा चीननंतरचा जगातील सोन्याचा दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार देश आहे. दागिन्यांची निर्यात वाढलीभारतामधून होणाऱ्या दागिन्यांच्या निर्यातीमध्ये चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये ७१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. ही निर्यात २.९ कोटी डॉलरवर पाेहोचली आहे. देशात  आयात होणाऱ्या सोन्यापैकी सर्वात मोठा वाटा हा दागिन्यांच्या निर्मितीसाठीचा आहे.

टॅग्स :सोनं