नवी दिल्ली : ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी राजधानी दिल्लीत सोने १५0 रुपयांनी वाढून ३३,0२0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदी मात्र २२५ रुपयांनी घसरून ३७,३२५ रुपये किलो झाली.ज्वेलरांनी खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे सोन्याला फटका बसला, तर औद्योगिक क्षेत्रातील मागणी घटल्यामुळे चांदी उतरली. जागतिक बाजारात तेजीचा कल राहिला. न्यूयॉर्क येथे सोने वाढून १,२८४.४0 डॉलर प्रतिऔंस झाले. चांदीही वाढून १४.४७ डॉलर प्रतिऔंस झाली.
सोने वाढले, चांदी उतरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 3:57 AM