नवी दिल्ली : सोन्याचा भाव मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी १० गॅ्रममागे वाढला; पण केवळ ५ रुपयांनी. दिवाळीचा सण आणि आगामी लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर दागिने निर्मात्यांकडून मागणी वाढल्यामुळे सोने या पाच रुपयांसह २६,२३५ रुपयांवर गेले. चांदी (तयार) मात्र किलोमागे तब्बल ५३५ रुपयांनी घसरून ३४,८७५ रुपयांवर आली.
विदेशी बाजारात सोन्याकडे असलेला कल आणि दागिने निर्मात्यांकडून सतत असलेल्या मागणीचा हा परिणाम असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. न्यूयॉर्कच्या बाजारात सोमवारी सोने ०.२३ टक्क्यांनी वाढून औंसमागे १,०९१.९० अमेरिकन डॉलर झाले होते. सिंगापूरच्या बाजारात ते ०.०३ टक्के खाली येऊन औंसमागे १,०९१.६० अमेरिकन डॉलर झाले होते.
चांदीच्या १०० नाण्यांचा भाव एक हजार रुपयांनी खाली येऊन खरेदीसाठी ४८ हजार व विक्रीसाठी ४९ हजार रुपये झाला.
सोने अल्प प्रमाणात वाढले; चांदी घसरली
सोन्याचा भाव मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी १० गॅ्रममागे वाढला; पण केवळ ५ रुपयांनी. दिवाळीचा सण आणि आगामी लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर दागिने निर्मात्यांकडून
By admin | Published: November 10, 2015 10:33 PM2015-11-10T22:33:48+5:302015-11-10T22:33:48+5:30