Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोठी बातमी! १ जूननंतर हॉलमार्कशिवाय सोन्याची विक्री नाही, फक्त ३ दर्जेदार गुणवत्तेचेच दागिने विकले जाणार

मोठी बातमी! १ जूननंतर हॉलमार्कशिवाय सोन्याची विक्री नाही, फक्त ३ दर्जेदार गुणवत्तेचेच दागिने विकले जाणार

Gold Jewellery Hallmarking: केंद्र सरकारनं आता सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क बंधनकारक केलं आहे. १ जून २०२१ नंतर हॉलमार्कशिवाय कोणतेही सोन्याचे दागिने विकता येणार नाहीयत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 07:09 PM2021-03-19T19:09:48+5:302021-03-19T19:10:33+5:30

Gold Jewellery Hallmarking: केंद्र सरकारनं आता सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क बंधनकारक केलं आहे. १ जून २०२१ नंतर हॉलमार्कशिवाय कोणतेही सोन्याचे दागिने विकता येणार नाहीयत.

gold jewellery hallmarking mandatory from 1 june 2021 | मोठी बातमी! १ जूननंतर हॉलमार्कशिवाय सोन्याची विक्री नाही, फक्त ३ दर्जेदार गुणवत्तेचेच दागिने विकले जाणार

मोठी बातमी! १ जूननंतर हॉलमार्कशिवाय सोन्याची विक्री नाही, फक्त ३ दर्जेदार गुणवत्तेचेच दागिने विकले जाणार

केंद्र सरकारनं आता सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क बंधनकारक केलं आहे. १ जून २०२१ नंतर हॉलमार्कशिवाय कोणतेही सोन्याचे दागिने विकता येणार नाहीयत. त्यामुळे ग्राहकांची होणारी फसवणूक थांबण्यास मदत होईल आणि दर्जेदार सोनं खरेदीची हमी ग्राहकांना मिळणार आहे. भारतीय मानक ब्युरो म्हणजेच बीआयएसनं सर्व नोंदणीकृत ज्वेलर्ससाठी अधिसूचना जारी केली आहे. (gold jewellery hallmarking mandatory from 1 june 2021)

सोन्याची शुद्धता आता तीन श्रेणींमध्ये विभागली जाणार आहे. यात २२ कॅरेट, दुसरं १८ कॅरेट आणि तिसरं १४ कॅरेट असे टप्पे असणार आहेत. केवल तीन प्रकारातील गुणवत्तेतील सोन्याच्या विक्रीमुळे ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये व्यवहाराची स्पष्टता राहील, असं म्हटलं जात आहे. 

सोन्याच्या दागिन्यांवर असणारा हॉलमार्क संबंधित दागिन्यासाठी वापरण्यात आलेल्या सोन्याची शुद्धता दर्शवतो. सध्या सोन्याच्या दागिन्यावर हॉलमार्क असं अनिवार्य नाही. पण आता १ जूननंतर ज्वेलर्सना केवळ हॉलमार्क असलेलेच सोन्याचे दागिने विकता येणार आहेत. 

Web Title: gold jewellery hallmarking mandatory from 1 june 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.