Join us  

Gold Jewellery Rule Change: १ एप्रिलपासून सोने, दागिने खरेदी नियमात होणार मोठा बदल; माहित नसेल तर म्हणाल बनावट...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 12:06 PM

सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीच्या नियमात मोठा बदल केला आहे.

सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीच्या नियमात मोठा बदल केला आहे. ३१ मार्च २०२३ पासून दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य असणार आहे. म्हणजेच हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांची खरेदी-विक्री करता येणार नाहीय. 

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ३१ मार्चनंतर एचयुआयडीशिवाय सोन्याचे दागिने विकता येणार नाहीएत. चार अंकी आणि सहा अंकी हॉलमार्किंगबाबत ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. 

हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) क्रमांक हा दागिन्यांची शुद्धता दर्शवितो. हा 6 अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे. याद्वारे ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांची सर्व माहिती मिळते. हा नंबर प्रत्येक दागिन्यावर लावला जातो. या कोडच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटनांमध्ये बरीच घट झाली आहे. सोनारांसाठी देशभरात १३३८ हॉलमार्किंग सेंटर खुली करण्यात आली आहेत.  

टॅग्स :सोनं