Lokmat Money > बिझनेस न्यूज > गोल्ड लोनमध्ये एकरकमी कर्ज फेडण्याचा पर्याय बंद होणार? काय असणार नवीन पर्याय?

गोल्ड लोनमध्ये एकरकमी कर्ज फेडण्याचा पर्याय बंद होणार? काय असणार नवीन पर्याय?

gold loans : तुम्ही जर सोने तारण कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आता पूर्वीसारखी एकरकमी कर्ज फेडण्याचा पर्याय आता बंद होण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 10:24 AM2024-11-20T10:24:43+5:302024-11-20T10:24:43+5:30

gold loans : तुम्ही जर सोने तारण कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आता पूर्वीसारखी एकरकमी कर्ज फेडण्याचा पर्याय आता बंद होण्याची शक्यता आहे.

gold loans may soon come with emi payment plans | गोल्ड लोनमध्ये एकरकमी कर्ज फेडण्याचा पर्याय बंद होणार? काय असणार नवीन पर्याय?

गोल्ड लोनमध्ये एकरकमी कर्ज फेडण्याचा पर्याय बंद होणार? काय असणार नवीन पर्याय?

gold loans : तुम्ही जर सोनेतारण कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँका आणि गोल्ड लोन कंपन्यांना कडक इशारा दिला आहे. सुवर्ण कर्ज वितरणातील त्रुटींबद्दल आरबीआयने नाराजी व्यक्त केली आहे. आरबीआय आता सुवर्ण कर्ज इंडस्ट्रीमध्ये काही बदल करण्याचा विचार करत आहे. या अंतर्गत, बँका आणि सुवर्ण कर्ज कंपन्या ग्राहकांना कर्ज सुरू केल्यानंतर मासिक हप्त्यांमध्ये व्याज आणि मुद्दलासह कर्जाची परतफेड करण्यास सांगू शकतात. सोन्याचे कर्ज देणाऱ्या बँकाही सोन्यावर कर्ज देण्यासाठी आवर्ती कर्जाचा मार्ग शोधत आहेत.

ईटीच्या अहवालानुसार, एका वरिष्ठ बँकिंग अधिकाऱ्याने सांगितले की, “सोने कर्ज कंपन्यांनी कर्ज घेणाऱ्याची परतफेड करण्याची क्षमता तपासावी आणि केवळ तारण ठेवलेल्या दागिन्यांवर अवलंबून राहू नये, असे स्पष्ट आदेश आरबीआयने दिले आहेत. त्यामुळे आता आम्ही सुवर्ण कर्जासाठी मासिक पेमेंट पर्याय तयार करत आहोत.

आरबीआयने ३० सप्टेंबर रोजी एका परिपत्रकात, सोन्याचे दागिने आणि दागिन्यांवर कर्ज देताना अनेक त्रुटींवर बोट ठेवले होते. मध्यवर्ती बँकेला सोन्याच्या कर्जाचे सोर्सिंग, मूल्यांकन, लिलावाची पारदर्शकता, एलटीव्ही प्रमाणाचे निरीक्षण आणि जोखीम यासारख्या बाबींमध्ये समस्या आढळल्या होत्या. अनेक बँका किंवा कंपन्या अर्धवट पेमेंटवर सुवर्ण कर्ज वाढवत असल्याचंही निदर्शनास आल्याने आरबीआयने नाराजी व्यक्त केली.

आता नवीन पेमेंट पर्यायाची तयारी
सध्या सुवर्ण कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे कर्जाचा मासिक हप्ता भरावा लागत नाही. तो संपूर्ण कर्ज एकरकमी फेडू शकतो. मात्र, हा प्रकार धोकादायक असल्याचे आरबीआयचे म्हणणे आहे. त्यामुळे आता गोल्ड लोनचे महिन्याला हप्ते भरावे लागणार आहे. दुसरा पर्याय म्हणजे जेव्हाही कर्जदाराकडे निधी उपलब्ध असेल तेव्हा आंशिक पेमेंट करणे. परंतु, आरबीआयची चिंता आणि इशाऱ्यांनंतर, बँका आणि एनबीएफसी सुवर्ण कर्जातील परतफेड प्रणाली सुधारण्यासाठी मासिक पेमेंट योजनांवर विचार करत आहेत.

 

 

Web Title: gold loans may soon come with emi payment plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.