Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने एक महिन्याच्या उच्चांकावर

सोने एक महिन्याच्या उच्चांकावर

जागतिक बाजारातील तेजी आणि ज्वेलरांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे दिल्लीत बुधवारी सोने २५0 रुपयांनी वाढून ३0,९५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले

By admin | Published: November 3, 2016 06:08 AM2016-11-03T06:08:17+5:302016-11-03T06:08:17+5:30

जागतिक बाजारातील तेजी आणि ज्वेलरांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे दिल्लीत बुधवारी सोने २५0 रुपयांनी वाढून ३0,९५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले

Gold up to one month's level | सोने एक महिन्याच्या उच्चांकावर

सोने एक महिन्याच्या उच्चांकावर


नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजी आणि ज्वेलरांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे दिल्लीत बुधवारी सोने २५0 रुपयांनी वाढून ३0,९५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. हा सोन्याचा एक महिन्याचा उच्चांक ठरला.
सिंगापूर बाजारात सोने 0.३५ टक्क्यांनी वाढून १,२९२.३0 डॉलर प्रति औंस झाले. स्थानिक बाजारात ज्वेलरांनी लग्नसराईची मागणी पूर्ण करण्यासाठी खरेदी केल्यामुळे सोने वाढले. दिल्लीत ९९.९ टक्के व ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव २५0 रुपयांनी वाढून अनुक्रमे ३0,९५0 रुपये आणि ३0,८00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. ३ आॅक्टोबरनंतरची ही सर्वोच्च पातळी ठरली. त्या दिवशी सोने ३१,२00 रुपयांवर होते. काल सोने ५0 रुपयांनी वाढले होते. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव मात्र, १२0 रुपयांनी घसरून २४,४00 रुपये प्रति नग झाला.

Web Title: Gold up to one month's level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.