Join us  

Gold price : स्वस्त झाले की महागले, आठवडाभरानंतर 10 ग्रॅम सोन्याचे दर किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 4:24 PM

Gold Rate Updates : आंतरराष्ट्रीय बाजार, देशात आभूषणांवर आकारला कर आणि घडवणूक खर्चातील बदलांमुळे सोन्याचे दर कमी जास्त होत असतात. गेल्या आठवडाभरात सोन्याच्या किंमतीमध्ये मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळाले. 

Gold price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांमध्ये चढ-उतार बघायला मिळत आहे. केंद्र सरकारने सोन्यावरील सीमा शुल्कामध्ये (Custom Duty) कपात करण्याची घोषणा अर्थ संकल्पात केली होती. त्यानंतर सोन्याचे दर वेगाने कमी होत गेले आणि प्रति 10 ग्रॅमचा दर 67 हजारांच्या जवळपास पोहोचले होते. पण, ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतींनी उसळली घेतली. त्यानंतर सातत्याने दर वाढत आहेत. 

सोन्याचे दर एका आठवड्यात किती वाढले?

 एमसीएक्स (Multi Commodity Exchange) वर नजर टाकली, तर आठवडाभरात सोन्याचे दर किती बदलले, हे समजून येते. ६ सप्टेंबर रोजी सोन्याचे दर ७१,४२६ रुपये प्रति १० ग्रॅम इतके होते. १३ सप्टेंबर रोजी सोन्याचे दर वाढून ७३,५१० रुपये प्रति १० ग्रॅम इतके झाले. 

म्हणजे एका आठवड्यातच सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम मागे २०८४ रुपयांनी वाढले आहेत. जुलै महिन्यातील दरासोबत तुलना केल्यास हे दर कमीच आहेत. २३ जुलै रोजी मोदी सरकारने अर्थ संकल्प सादर केला. अर्थ संकल्पाच्या काही दिवस आधी म्हणजे १६ जुलै रोजी सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ७४,६४४ रुपये इतके होते. 

सोन्याचे काय आहेत दर?

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर ६ सप्टेंबर रोजी ७१,९३१ रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. १३ सप्टेंबर रोजी ७३,०४० रुपये प्रति १० ग्रॅम इतके दर वाढले. २२ कॅरेट सोन्याचा दर सध्या ७१,२९० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. २० कॅरेट सोन्याचा दर ६५,०१० रुपये प्रति १० ग्रॅम, १८ कॅरेट सोन्याचा दर ५९१७० प्रति १० ग्रॅम इतका, तर १४ कॅरेट सोन्याचा दर ४७,११० रुपये इतका आहे. 

चांदीचे दरही वाढले

सोन्याबरोबर चांदीच्या किंमतीही वाढल्या आहेत. गेल्या आठवडाभरात चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ६ सप्टेंबर रोजी एक किलो चांदीचा दर 82,757 रुपये होते. १३ सप्टेंबर रोजी एक किलो चांदीचा दर ८९,२४४ रुपयांवर पोहोचला. एका आठवड्यात चांदीचा दर किलोमागे ६,४८७ रुपयांनी वाढला आहे.

टॅग्स :सोनंचांदीव्यवसायकेंद्र सरकार