Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुड न्यूज! सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचा दर

गुड न्यूज! सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचा दर

gold rate today 29 january 2021: सोन्याचा किंमतीत आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 09:37 AM2021-01-29T09:37:15+5:302021-01-29T09:38:12+5:30

gold rate today 29 january 2021: सोन्याचा किंमतीत आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे.

gold price down today in india latest rate 29 january 2021 | गुड न्यूज! सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचा दर

गुड न्यूज! सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचा दर

gold rate today 29 january 2021: सोन्याचा किंमतीत आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात आज दिवसाच्या सुरुवातीला १० रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. आजची घट फक्त १० रुपयांची जरी असली तरी काल सोन्याच्या दरात ३३० रुपयांची घट झाली होती. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी दरात घट झाल्यानं सोन्याचा आजचा दर प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी ४७,७९० इतका झाला आहे. 

देशात गुरुवारी संध्याकाळी बाजार बंद होईपर्यंत सोन्याचा दर ४७,८०० इतका नोंदविण्यात आला होता. त्यात आज सकाळी १० रुपयांची घट होऊन दर ४७,७९० रुपये इतका पाहायला मिळतो आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम देशातील सोन्यावरही पाहायला मिळतो आहे. दुसऱ्याबाजूला शेअर बाजारातही गुरुवारी घसरण झाली होती. मुंबईशेअर बाजाराचानिर्देशांक ५३५.५७ म्हणजेच १.१३ टक्क्यांनी घसरून ४६ हजार ८७४.३६ अंकांवर बंद झाला होता. याचाच परिणाम सोन्याच्या दरावरही पाहायला मिळाला. 

Good Returns वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी ४७,७९० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्यासाठी ४८,७९० रुपये मोजावे लागतील. 

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा दर
मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरात २२ कॅरेट सोन्यासाठी ४७,७९० हजार रुपये मोजावे लागतील. तर देशात बंगळुरू, केरळ आणि हैदराबादमध्ये सर्वात कमी ४५,६४० रुपये इतका दर नोंदविण्यात आला आहे.
 

Web Title: gold price down today in india latest rate 29 january 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.