Gold Silver Price 23 April: अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या भावात २७०० रुपयांची मोठी घसरण झालीये. आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ९५,७८४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर चांदी ५०८ रुपयांनी महाग होऊन ९६,११५ रुपये प्रति किलो ग्रॅम झाली आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (आयबीजेए) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत, ज्यात जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्यांदा सायंकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर केले जातात.
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर मधील 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द, जमा रकमेचं काय होणार?
आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव २६९० रुपयांनी घसरून ९५,४०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव दुपारच्या सुमारास २४७३ रुपयांनी घसरून ८७,७३८ रुपये झाला. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव २०२५ रुपयांनी घसरून ६६,९६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. दुसरीकडे १४ कॅरेट सोन्याचा भाव १७७९ रुपयांनी घसरून ५६,०३४ रुपये झालाय.
मंगळवारी दिल्लीत सोन्याचे दर १.०२ लाख रुपयांच्या पुढे (जीएसटीसह) गेले होते. छोट्या गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणुकीपासून माघार घेतली आहे. त्यामुळे दिल्लीच्या घाऊक बाजारात सोन्याच्या विक्रीत ६० टक्क्यांची घसरण झाली आहे.
५५००० चा अंदाज खरा ठरणार का?
केडिया कमोडिटीजचे अध्यक्ष अजय केडिया यांच्या म्हणण्यानुसार या दाव्यात काहीच तथ्य नाही. कारण, सोन्याला आधार देणारे घटक अजूनही वरचढ आहेत. जसं भूराजकीय तणाव (युद्ध, तणाव), डी-डॉलरायझेशन, मध्यवर्ती बँका आणि ईटीएफ खरेदी सुरू आहे. महागाई आणि मंदीची भीतीही सतावत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे धाव घेत आहेत. यामुळे सोनं महागणार आहे. यात थोडीशी सुधारणा होऊ शकते, पण ५०००० आणि ५५००० च्या पातळीवर येणं अशक्य वाटतं, असंही ते म्हणाले.