लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण बघायला मिळाली आहे. बुधवारच्या बंद भावाचा विचार करता, चांदी प्रति किलो 700 रुपयांनी तर सोने सुमारे 300 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
आता 24 कॅरेट सोने आपल्या ऑल टाईम हाई रेट पेक्षा 2685 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर, चांदी 2 फेब्रुवारीच्या किंमतीपेक्षा 6283 रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे. 2 फेब्रुवारीला चांदी 71576 रुपये प्रति किलोवर होती. तर सोने 58882 रुपये प्रति 10 ग्रॅम या ऑल टाईम हायवर पोहोचले होते.
आयबीजेएवर लेटेस्ट गोल्ड-सिलव्हर रेट -Gold Price 24 कॅरेट (999) 56197 रुपये प्रति 10 ग्रॅम Gold Price 23 कॅरेट (995) 55972 रुपये प्रति 10 ग्रॅमGold Price 22 कॅरेट (916) 51477 रुपये प्रति 10 ग्रॅम Gold Price 18 कॅरेट (750) 42148 रुपये प्रति 10 ग्रॅम Gold Price 14 कॅरेट (585) 32875 रुपये प्रति 10 ग्रॅमSilver (999) 65293 रुपये प्रति किलो
आज सोन्याचा दर बुधवारच्या बंद झालेल्या 56496 रुपयांच्या तुलनेत, 299 रुपयांनी स्वस्त होऊन 56197 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला. तसेच, चांदी 693 रुपये प्रति किलोने स्वस्त होऊन 65293 रुपयांवर आली आहे. सोन्या-चांदीचा हा दर आयबीजेएने जारी केलेला सरासरी दर आहे. जे अनेक शहरांतून घेण्यात आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्ज लावण्यात आलेला नाही. आपल्या शहरात सोने-चांदी या दरापेक्षा 500 ते 2000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत स्वस्त अथवा महाग मिळू शकते.