Lokmat Money > बिझनेस न्यूज > नवरात्रीत सोने-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी; किती झाली घसरण? तुमच्या शहरातील दर काय?

नवरात्रीत सोने-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी; किती झाली घसरण? तुमच्या शहरातील दर काय?

Gold Silver Price : या सणासुदीत तुम्ही सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 01:15 PM2024-10-10T13:15:44+5:302024-10-10T13:15:44+5:30

Gold Silver Price : या सणासुदीत तुम्ही सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे.

gold price falls again silver rate also slips check latest rates on 10 october 2024 | नवरात्रीत सोने-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी; किती झाली घसरण? तुमच्या शहरातील दर काय?

नवरात्रीत सोने-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी; किती झाली घसरण? तुमच्या शहरातील दर काय?

Gold Silver Price : तुम्ही जर नवरात्रीत सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आली आहे. सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात पुन्हा थोडी घसरण झाली. तर याच आठवड्यात चांदी तब्बल १ हजार रुपयांनी घसरली आहे. भविष्यात सोने ८५ हजारांच्या पार जाण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे सोन्यात अजूनही गुंतवणुकीची संधी आहे.

मुंबईत सोन्याचा आजचा भाव
मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव १० रुपयांनी घसरून ७६,६८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ७०,२९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. याशिवाय गुरुवारी चांदीचा भावही १०० रुपयांनी घसरून ९३,९०० रुपये प्रतिकिलो झाला आहे.

फ्युचर्स मार्केटमध्ये किंमत वाढली
मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच एमसीएक्समध्ये सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. येथे सकाळी १०.२१ वाजता, ५ डिसेंबरच्या करारासाठी सोन्याची फ्युचर्स किंमत ०.१६ टक्क्यांच्या वाढीसह ७५,०५५ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​व्यवहार करताना दिसून आली. याच कालावधीत एमसीएक्सवर ५ डिसेंबरच्या करारासाठी चांदीचा भावही ०.३० टक्क्यांनी वाढून ८९,१४० रुपये प्रति किलोवर पोहोचला.

तुमचं सोनं शुद्ध आहे का?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (Indian Standard Organization) द्वारे हॉल मार्क दिले जातात. २४ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर ९९९, २३ कॅरेटवर ९५८, २२ कॅरेटवर ९१६, २१ कॅरेटवर ८७५ आणि १८ कॅरेटवर ७५० असे लिहिले आहे. बहुतेक सोने २२ कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक १८ कॅरेट देखील वापरतात. कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध मानले जाते.

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आणि 22 कॅरेट सोने अंदाजे ९१ टक्के शुद्ध आहे. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे ९% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी ते दागिने घडवण्यासाठी वापरता येत नाही. त्यामुळे बहुतांश दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

मिस्ड कॉलवरून किंमत जाणून घ्या
२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी, तुम्ही ८९५५६६४४३३ वर मिस कॉल करू शकता. काही वेळात एसएमएसद्वारे दर उपलब्ध होतील. याशिवाय, सतत अपडेट्सच्या माहितीसाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.

Web Title: gold price falls again silver rate also slips check latest rates on 10 october 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.