Join us  

लग्नसराईत सोन्याचा भाव घसरला, चांदीही 956 रुपयांनी स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 1:49 PM

सोने-चांदीचे दर हे आयबीजेएने जारी केलेले सरासरी दर आहेत. जे अनेक शहरांतून घेण्यात आले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्ज लावण्यात आलेला नसतो.

लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीचे दर घसरल्याचे दिसत आहे. आज सराफा बाजारात सोन्याचा भाव सोमवारच्या 60629 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या तुलनेत 150 रुपयांनी स्वस्त होऊन 60479 रुपयांवर खुला झाला. तर, चांदी 956 रुपयांनी स्वस्त होऊन 74574 रुपयांवर आली आहे.

सोने-चांदीचे दर हे आयबीजेएने जारी केलेले सरासरी दर आहेत. जे अनेक शहरांतून घेण्यात आले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्ज लावण्यात आलेला नसतो. आज सराफा बाजारात सोने पाच एप्रिलच्या 60977 रुपयांच्या ऑल टाइम हायवरून 498 रुपये स्वस्त आहे. याशिवाय 4 एप्रिलला सोन्याने एमसीएक्सवर 61145 रुपयांच्या नव्या ऑल टाइम हायला टच केले होते.

IBJA दिवसांतून दुपारी आणि सकाळी असे दोन वेळा गोल्ड रेट जारी करत असते. हे दर अर्थमंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडून जारी विविध अधिसूचनांनुसार सॉवरेन आणि बॉन्ड जारी करण्यासाठीचे बेंचमार्क दर आहेत. IBJA चे 29 राज्यांमध्ये कार्यालये आहेत आणि हे सर्वच सरकारी संस्थांचा भाग आहे.

लक्षात असू द्या ही महत्वाची गोष्ट - जर आपण सोनं खरेदीसाठी बाजारात जात असाल तर हॉलमार्क बघूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता चेक करण्यासाठी आपण सरकारी अॅपचाही वापर करू शकता. ‘BIS Care app’ च्या माध्यमाने आपण सोन्याची शुद्धता चेक करू शकता. याशिवाय याच अॅपच्या माध्यमाने आपण तक्रारही करू शकता.

टॅग्स :सोनंचांदीबाजार