Lokmat Money > बिझनेस न्यूज > ...म्हणून येत्या २ महिन्यांत सोन्याचे भाव आणखी भडकणार; ही असू शकतात 'कारणं'

...म्हणून येत्या २ महिन्यांत सोन्याचे भाव आणखी भडकणार; ही असू शकतात 'कारणं'

कोरोना व्हायरस महामारीपासून अर्थव्यवस्थेला वाचविण्यासाठी अमेरिकेसह जगातील सेंट्रल बँक मदत पॅकेजची घोषणा करू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 12:01 PM2020-07-12T12:01:04+5:302020-07-12T12:18:05+5:30

कोरोना व्हायरस महामारीपासून अर्थव्यवस्थेला वाचविण्यासाठी अमेरिकेसह जगातील सेंट्रल बँक मदत पॅकेजची घोषणा करू शकते.

gold price gold can surge up to rs 65000 per ten grams in 2021 know why | ...म्हणून येत्या २ महिन्यांत सोन्याचे भाव आणखी भडकणार; ही असू शकतात 'कारणं'

...म्हणून येत्या २ महिन्यांत सोन्याचे भाव आणखी भडकणार; ही असू शकतात 'कारणं'

नवी दिल्लीः जानेवारीत सुरू झालेल्या सोन्याच्या किमतीतील तेजी अद्यापही सुरूच आहे. देशांतर्गत सराफा बाजारात यावर्षी 10 ग्रॅम सोन्याचे (Gold Spot Rate) दर 50 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरस महामारीपासून अर्थव्यवस्थेला वाचविण्यासाठी अमेरिकेसह जगातील सेंट्रल बँक मदत पॅकेजची घोषणा करू शकते. अशा परिस्थितीत अमेरिकन डॉलर कमकुवत होईल. त्यामुळे सोन्याच्या किमती वाढतील. अशा वातावरणात भारतीय सराफा बाजारात दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमती सध्याच्या पातळीवरून प्रतिदहा ग्रॅम 2000 रुपयांनी वाढून 52 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात. त्याच वेळी 2021मध्ये सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 65 हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. 

म्हणून सोने महाग होईल?

१. कोरोना व्हायरस महामारी- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे की, कोरोना व्हायरस महारोगराईमुळे येत्या काळात मंदीची मोठी लाट येईल आणि त्याची पुनर्प्राप्ती खूपच वेगवान असेल. आयएमएफच्या म्हणण्यानुसार, जागतिक उत्पादन घटून 4.9 टक्क्यांवर येईल, तर विकसनशील देशांमध्ये वाढीचा दर 3 टक्क्यांपर्यंत खाली येईल. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करू शकतात. 

२. डॉलर कमकुवत झाल्यामुळे- देशातील अर्थव्यवस्था कोरोना साथीच्या आजारापासून वाचविण्यासाठी अमेरिकेसह मध्यवर्ती बँका आणि जग मदत पॅकेजेसची घोषणा करू शकतात. अशा परिस्थितीत अमेरिकन डॉलर कमकुवत होईल. त्यामुळे सोन्याच्या किंमती वाढतील.  कोरोना साथीच्या आजारापासून देशाच्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकन डॉलर कमकुवत होईल. त्यामुळे सोन्याच्या किंमती वाढतील.

3. भारत-चीन तणाव- अमेरिका आणि चीन आणि भारत-चीन यांच्यातील तणावामुळे सोन्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. 

चांदी देखील महाग होईल?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सोन्याप्रमाणेच चांदीदेखील आपली तेजी कायम ठेवेल, अशी अपेक्षा आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे कमोडिटी अँड करन्सीचे हेड आणि असोसिएट डायरेक्टर किशोर नार्णे यांचे म्हणणे आहे की, येत्या 18-24 महिन्यांत सोन्याच्या किंमती 65000-68000च्या पातळीवर जातील. तर येत्या 6 महिन्यात एमसीएक्सवर चांदीचे दर ५७ हजार रुपये प्रति किलोग्राम होऊ शकतात. 

सोन्याची गुंतवणूक सुरक्षित का आहे?
(१) सोन्याबाबत गुंतवणूकदारांच्या मनात सुरक्षितता आहे. मालमत्तेसारख्या रिअल इस्टेट खरेदी करण्याऐवजी सोन्यात गुंतवणूक करणे सोपे जाते. डिजिटल मालमत्ता हॅक होण्याची किंवा त्याचा गैरवापर होण्याचा धोका आहे, परंतु सोन्याच्या बाबतीत असा कोणताही धोका नाही.

(२) इतर मालमत्तांसारखा सोन्यात नकारात्मक प्रभाव नसतो, सोन्याचे दरात चढउतार येत असतात. याच कारणास्तव सोन्याच्या पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण दिसते. इतर मालमत्तेवर परिणाम करणारे पॅरामीटर्स त्याच्या पद्धतीनं सोन्यावर किमतीवर परिणाम करीत नाहीत. या कारणास्तव सोन्यात जोखीम कमी असते. तथापि, असे मानले जाते की समभाग कमी झाल्यास सोने आणि इक्विटीमध्ये नकारात्मक परस्पर संबंध येऊ शकतात. 

(३) गरजेच्या वेळी सोने तारण ठेवून रोखरक्कम काढता येते, तेही वेगवान पद्धतीनं होत असते. इतर मालमत्तेच्या तुलनेत सोन्याच्या गुंतवणुकीसाठी कोणताही लॉक-इन पीरियड नाही. (सरकारी हमीवरील सोन्याचे बंध). सोनीची किंमत शुद्धता, बाजारभाव यासारख्या गोष्टींवर अवलंबून असते. सोन्यावर कर्जही घेतले जाऊ शकते.

हेही वाचा

CoronaVirus News : पुनश्च 'होम'! 'या' प्रश्नांची उत्तरे मिळणार का? 

भारताकडून पहिल्यांदाच मालाबार युद्धाभ्यासाचं ऑस्ट्रेलियाला आमंत्रण; चीन भडकला

धक्कादायक! अंत्यसंस्कारासाठी चक्क रिक्षातून आणला कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृतदेह

...म्हणून अशानं दोन देशांमधले सगळेच प्रश्न सुटत नसतात, शरद पवारांचा मोदींना सल्लावजा टोला

CRPFनं काढली बंपर भरती; बेरोजगारांना नोकरीची संधी; 1.42 लाखांपर्यंत मिळणार पगार 

Web Title: gold price gold can surge up to rs 65000 per ten grams in 2021 know why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं