- विजयकुमार सैतवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नवरात्रोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वीच सोने-चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शनिवारी सोन्याच्या भावात एकाच दिवसात १,५०० रुपयांची वाढ होऊन ते ६०,७०० रुपये प्रतितोळा झाले आहे. तर चांदीच्याही भावात एकाच दिवसात एक हजार ७०० रुपयांची वाढ होऊन ती ७२ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. नवरात्रोत्सव काळातील संभाव्य मागणी, हमास-इस्रायल युद्ध व डॉलर वधारल्याने ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सव्वा दोन महिन्यांनंतर सोने ६० हजार पार
n यापूर्वी ६ ऑगस्ट रोजी सोने ६० हजार रुपयांवर होते.
n त्यानंतर भाव कमी-कमी होत गेले.
n आता पुन्हा ते ६० हजारांपुढे गेले .
n चांदीदेखील २९ सप्टेंबरनंतर ७२ हजार रुपयांवर पोहोचली आहे.
१५००
सोने (रु.)
१७००
चांदी (रु.)
३३०० रुपये
सोन्यात वाढ नऊ दिवसांत
५ ऑक्टोबर ५७,४००
१४ ऑक्टोबर ६०,७००
(दर प्रतितोळा, रुपयांत)
चांदीत आठ दिवसांत वाढ
६ ऑक्टोबर ६७,९००
१४ ऑक्टोबर ७२,०००