Join us

सोन्याला झळाळी, चांदी 2380 रुपयांनी घसरली; जाणून घ्या, ऑगस्टमध्ये कशी राहणार स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2021 6:18 PM

तज्ज्ञांनी या आधीच सांगितले, आहे, की या वर्षाच्या अखेरपर्यंत सोन्याचा दर मागील सर्व विक्रम मोडून 60,000 रुपये प्रती 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतात.

नवी दिल्‍ली - सोनं केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगात गुंतवणुकीचा एक अत्यंत चांगला पर्याय मानला जातो. कोरना काळातही लोकांनी सोन्यात प्रचंड गुंतवणूक केली. गेल्या वर्षी ऑगस्‍ट महिन्यात तर सोन्याच्या दराने सर्वोच्च टोक गाठले होते. मात्र, कोरोना व्हायरस विरोधात जस-जशी लढाई तीव्र होत गेली, तस तसे सोन्याचे दरही कमी होताना दिसले. यानंतर, पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सोन्याचे दर वाढले. नंतर, पुन्हा लसीकरणात तेजी आली आणि सोन्याचे दर कमी झाले. आता जुलै 2021 मध्ये सोन्याने गुंतवणूकदारांना पुन्हा नफा मिळवून दिला आहे. याउलट आता चांदीचे दर घसरले आहेत. (Gold price increased by rupees 1132 and silver cheaper by rs 2380 know how trend would be in august 2021)

दिल्‍ली सराफा बाजारात 1 जुलै 2021 रोजी सोन्याचा दर 46,310 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर तर चांदी 68,654 रुपये प्रती किलो ग्रॅम होती. या तुलनेत, 30 जुलै 2021 रोजी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 47,442 रुपये प्रती 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 66,274 रुपये प्रती किग्रॅमवर बंद झाला होता. यानुसार, सोन्याचा दर जुलै महिन्यात 1,132 रुपये प्रती 10 ग्रॅमने वाढला. तर चांदीचा दर जुलैमध्ये 2,380 रुपयांनी घसरला. 

लाँग टर्म इंव्हेस्‍टमेंटमध्ये किती फायदा होऊ शकतो -तज्ज्ञांच्या मते, महागाईमुळे पुढील काही आठवडे सोन्याच्या दरात अस्थिरता पाहायला मिळेल. यात फारशी वाढ झालेली दिसणार नाही. तरीही ऑगस्ट 2021मध्ये सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसू शकते. सोन्याचे दर 48,500 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. तर दीर्घ कालीन गुंतवणुकीचा विचार करता, तज्ज्ञांनी या आधीच सांगितले, आहे, की या वर्षाच्या अखेरपर्यंत सोन्याचा दर मागील सर्व विक्रम मोडून 60,000 रुपये प्रती 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतात. अशात सोन्यात केलेल्या गुंतवणुकींचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा होऊ शकतो.

टॅग्स :सोनंचांदीभारतबाजार