नवी दिल्ली - दिवाळी (Diwali 2021) आणि धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर आपण सोने खरेदी करण्याच्या विचारत असाल, तर लवकरच खरेदी करा. कारण दिवाळीनंतर सोन्याच्या दरात (Gold Price on diwali 2021) जोरदार वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात सोन्याचा दर 46 ते 47 हजारदरम्यान सुरू आहे आणि आगामी काळात लवकरच हा दर वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर सोन्याचा दर 53000 च्याही पुढे जाऊ शकतो. (Gold Price)
53000 रुपयांच्याही पुढे जाऊ शकतो सोन्याचा दार -मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्व्हिसेसनुसार, सोन्याचा दर लवकरच 53000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पहोचू शकतो. सध्या सोन्याचा दर जवळपास 46000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. यानुसार, सोन्याच्या दरा 7000 ते 8000 रुपये प्रति 10 ग्रॅमची वृद्धी बघायला मिळू शकते. त्यामुळे आपण आताच सोने खरेदी केल्यास आपल्याला मोठा फायदा होऊ शकतो.
यावर्षी सोन्याची चकाकी वाढणार - गेल्यावर्षी कोरोनामुळे बाजारात फारसा उत्साह नव्हता. मात्र, आता फेस्टिव्हल सिझनमध्ये बाजाराबरोबरच सोन्याच्या दरातही तेजी बघायला मिळत आहे. आशा आहे, की सोन्याच्या दरात दिवाळीपर्यंत तेजी कायम राहू शकतो. गेल्या वर्षी याच काळात सोन्याचा दर विक्रमी 56200 रुपयांवर पोहोचला होता.
मुंबईत काय आहे आजचा दर? -मुंबईचा विचार करता, गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,050 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर वाढला असून मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 48,050 प्रति 10 ग्रॅम आहे.