Lokmat Money > बिझनेस न्यूज > या धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याचा विचार आहे? पिवळ्या धातूवर किती लागतो टॅक्स?

या धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याचा विचार आहे? पिवळ्या धातूवर किती लागतो टॅक्स?

Investment in Gold : सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय आहेत. भौतिक सोन्यासोबत तुम्ही डिजिटल सोने देखील खरेदी करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 12:01 PM2024-10-21T12:01:12+5:302024-10-21T12:03:09+5:30

Investment in Gold : सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय आहेत. भौतिक सोन्यासोबत तुम्ही डिजिटल सोने देखील खरेदी करू शकता.

gold price on dhanteras know how much tax is levied on gold | या धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याचा विचार आहे? पिवळ्या धातूवर किती लागतो टॅक्स?

या धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याचा विचार आहे? पिवळ्या धातूवर किती लागतो टॅक्स?

Investment in Gold : देशभरात दिवाळीच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये लगबग पाहायला मिळत आहे. भारतीय संस्कृतीत सोन्याला विशेष महत्त्व आहे. अनेक सणांना सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. यामध्ये अक्षय्य तृतीया आणि धनत्रयोदशी हे प्रमुख आहेत. धनत्रयोदशीला फारसा अवधी उरलेला नाही. यावर्षी २९ ऑक्टोबर २०२४ रोजी धनत्रयोदशी साजरी होणार आहे. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. सोने फक्त दागिने नाही तर गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. यामध्ये अनेक प्रकारे गुंतवणूक करता येते. दागिने, सोन्याची नाणी, डिजिटल गोल्ड, सॉवरेन गोल्ड बाँडसह तुम्ही गोल्ड ईटीएफमध्ये पैसे गुंतवू शकता किंवा गोल्ड सेव्हिंग स्कीममध्ये देखील चांगला पर्याय आहे. पण, सोन्याच्या गुंतवणुकीवर किती टॅक्स लागतो हे तुम्हाला माहिती आहे का?

फिजिकल गोल्ड
फिजिकल गोल्ड आणि डिजिटल सोने या दोन्हींवर एकाच प्रकारे कर आकारला जातो. खरेदी केल्यानंतर ३ वर्षांनी विकल्यास त्यावर २०% + ८% सेससोबत लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो. जर तुम्ही ३ वर्षांच्या आत सोने विकले तर नफा तुमच्या उत्पन्नात जोडला जाईल आणि स्लॅबनुसार कर आकारला जातो.

सॉवरेन गोल्ड बॉन्ड (SGB)
सॉवरेन गोल्ड बॉन्डसाठी कर नियम वेगळे आहेत. तुम्ही त्यांना खरेदी केल्यापासून ३ वर्षांच्या आत दुय्यम बाजारात विकल्यास, तुमच्या स्लॅबच्या दरानुसार त्याच्यावर कर आकारला जातो. परंतु, तुम्ही त्यांना ३ वर्षे ठेवल्यानंतर त्याची विक्री केल्यास, इंडेक्सेशननंतर त्यांच्यावर २० टक्के लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो. आणि जर तुम्ही ते मॅच्युरिटी होईपर्यंत ठेवलं तर त्यांच्यावर कोणताही कर नाही. या बाँड्सचा मॅच्युरिटी कालावधी ८ वर्षांचा आहे. तर ५ वर्षांनंतर, लवकर पूर्तता करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. या रोख्यांवर मिळणाऱ्या २.५ टक्के वार्षिक उत्पन्नावर स्लॅबनुसार कर आकारला जातो.

गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF)
ईटीएफवरील कमाईवर आयकर स्लॅबनुसार कर आकारला जातो. तुम्ही हे कधी विकता? यावर काही फरक पडत नाही.

फिजिकल गोल्ड घ्यावे की डिजिटल?
तुम्ही सोन्याकडे चांगला गुंतवणूक पर्याय म्हणून पाहत असाल तर डिजिटल गोल्ड कधीही चांगले आहे. कारण, यामध्ये फिक्स व्याजदर असून बाजाराच्या वाढीनुसारही तुम्हाला परतावा मिळतो. गेल्या काही महिन्यात सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. ही वाढ भविष्यातही अशीच राहणार असल्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थिती तुम्ही भौतिक सोने घेण्यापेक्षा विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करू शकता.

Web Title: gold price on dhanteras know how much tax is levied on gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.