Join us

Gold Price on Diwali: दिवाळीत वाढली सोन्या-चांदीची चमक; खरेदीपूर्वी पाहा खिशावर किती भार पडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 2:24 PM

Gold Price on Diwali: ऐन दिवाळीत सोन्या-चांदीच्या दरात तेदी दिसून येत आहेत. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर.

Gold Price on Diwali: शेअर बाजारातील घसरणीदरम्यान सोन्याचे कालच्या उच्चांकी ७९६८१ रुपयांच्या तुलनेत किंचित खाली राहिले आहेत. मात्र, परवाच्या तुलनेत सोन्याचा भाव ५८ रुपयांनी वधारून ७९,५८१ रुपये प्रति किलो ग्रॅम झाला. चांदीच्या दरात मात्र ११२७ रुपयांनी वाढ झाली आहे. हा दर आयबीएनं जाहीर केलेला आहे, ज्यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. तर चांदी ९७,८७३ रुपयांवर बंद झाली.

१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर

आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ५८ रुपयांनी वाढून ७९,३२० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. आज २२ कॅरेट सोन्याचा भाव १२५ रुपयांनी वाढून ६९,९६० रुपये झालाय. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव आज ४३ रुपयांनी वधारला असून तो ४९७२९ रुपये प्रति १० ग्रॅम वर खुला झाला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ३४ रुपयांनी वाढून ४६,५८९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

दर का वाढत आहेत?

जगातील भूराजकीय तणावाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करत आहेत, कारण असुरक्षित वातावरणात गुंतवणुकीसाठी सोनं हा गुंतवणूकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. त्यामुळे सर्वसामान्यां बरोबरच जगातील सर्व मध्यवर्ती बँकाही सोन्याचा साठा वाढवत आहेत.

आता काय करायचं?सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर आहेत, त्यामुळे भाव घसरण्याची वाट पाहण्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढू शकतो. संपूर्ण वर्षभर सोन्याची मागणी ७०० ते ७५० टनांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचित कमी आहे. लग्नसमारंभाच्या पार्श्वभूमीवरही सोन्याची एकूण मागणीही वाढण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये भारताची सोन्याची मागणी ७६१ टन होती.

टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक