नवी दिल्ली : सराफांकडून विशेष अशी मागणी नसल्यामुळे सोमवारी सोने दहा ग्रॅमसाठी २६,३६० रुपयांवर स्थिर राहिले. जागतिक बाजारातही सोन्याचा भाव न चमकणाराच राहिला. मात्र उद्योगांकडून आणि नाणे निर्मात्यांकडून मागणी नसल्यामुळे चांदी किलोमागे १०० रुपयांनी स्वस्त होऊन ३४,८०० रुपयांवर आली. दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेत्यांकडून मर्यादित मागणी असल्यामुळे सोन्याचे भाव स्थिर राहिल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय या आठवड्यात घेण्याची प्रतीक्षा गुंतवणूकदारांना असल्यामुळे सिंगापूरमध्ये सोने औंसमागे ०.३ टक्क्यांनी स्वस्त होऊन १,१०४ अमेरिकन डॉलरवर आले.
राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेचे सोने १० ग्रॅमला अनुक्रमे २६,३६० व २६,२१० रुपये असे स्थिर होते.
आठ ग्रॅमच्या सुवर्ण नाण्याचा भाव आधीच्या २२,१०० रुपयांवरच स्थिर होता. तयार चांदी किलोमागे १०० रुपयांनी स्वस्त होऊन ३४,८०० रुपये, तर वीकली बेसड् डिलिव्हरीची चांदी किलोमागे ५० रुपयांनी खाली येऊन ३४,००० रुपयांवर आली. चांदीच्या नाण्यांचा भाव बदलला नाही. तो खरेदीसाठी १०० नाण्यांना ५० हजार तर विक्रीसाठी ५१ हजार रुपये होता.
सोन्याचा भाव स्थिर, चांदी मात्र १०० रुपयांनी खाली
सराफांकडून विशेष अशी मागणी नसल्यामुळे सोमवारी सोने दहा ग्रॅमसाठी २६,३६० रुपयांवर स्थिर राहिले. जागतिक बाजारातही सोन्याचा भाव न चमकणाराच राहिला.
By admin | Published: September 15, 2015 03:51 AM2015-09-15T03:51:31+5:302015-09-15T03:51:31+5:30