लग्नाचे मुहुर्त सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. पण यापूर्वी सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीनं ग्राहकांची झोप उडवण्यास सुरूवात केली आहे. सर्राफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. सोन्या चांदीच्या दरात मोठी तेजीही आलीये. सर्राफा बाजारात सोन्याचे दर मंगळवारी ६०३९० रुपयांवर बंद झाले होते. परंतु बुधवारी यामध्ये ३५८ रुपयांची वाढ होऊन ते ६०७४८ रुपये प्रति १० ग्रामवर उघडले. तर दुसरीकडे चांदीच्या दरात ९४९ रुपये प्रति किलोची वाढ होऊन ती ७५३६५ वर पोहोचली.
सराफा बाजारात, ५ एप्रिल रोजी सोन्याच्या दरानं ६०,९७७ रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता. सध्याच्या दरानुसार यामध्ये २२९ रुपयांची घसरण झाली आहे. याशिवाय ४ एप्रिल रोजी MCX वर सोन्याच्या दरानं ६११४५ रुपयांचा नवा आजवरचा उच्चांकी स्तर गाठला. होता. सोने आणि चांदीचे हे दर IBJA द्वारे जारी केलेले सरासरी दर आहेत, जे अनेक शहरांमधून घेतले गेले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंगचे शुल्क लावण्यात आलेले नाहीत.
चांदी ७६ हजारांपार
फेडरल रिझर्व्हच्या शक्यतांदरम्यान अमेरिकन डॉलर्समध्ये घसरण झाल्यानं चांदीचे दर आज ७६००० रुपयांवर पोहोचले असल्याची प्रतिक्रिया केडिया कॅपिटलचे प्रेसिडेंट अजय केडिया यांनी दिली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन १०४ वर्ष जुनं असोसिएशन आहे. दिवसातून दोन वेळा असोसिएशनकडून सोन्याचे दर जारी केले जातात. हे दर अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेद्वारे अनेक अधिसूचनांनुसार सॉवरेन आणि बॉन्ड जारी करण्यासाठी बेन्चमार्क दर आहे. आयबीजेएची २९ शहरांमध्ये कार्यालये असून ते सर्व आता सरकारी संस्थांचा भागही आहेत.