Join us  

Gold Price Today: नवरात्रोत्सवापूर्वी सोन्याच्या दरात मोठा बदल; खरेदीला जाण्यापूर्वी जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2021 8:31 PM

Gold Rate Today: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात किंचित घट झाली. सोने 1,752 डॉलर प्रति औंस होते. तर चांदी 22.16 डॉलर प्रति औंस होते. वर्षाच्या अखेरीस सोने नवीन रेकॉर्ड करू शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Gold Rate Today: गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. यामुळे नवरात्रोत्सव, दिवाळीपूर्वी सोन्याचे दर उतरतील आणि आपण सोने घेऊ अशा विचारात असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दिल्लीत सोन्याची किंमत 555 रुपयांनी वाढली असून तिथे 10 ग्रॅमचा दर हा 45,472 रुपये झाला आहे. 

 एचडीएफसी सिक्योरिटीजने ही माहिती दिली आहे. सोन्याच्या दरात वाढ ही विनिमय दरात झालेल्या घसरणीमुळे झाली आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात वाढ झाली होती. 44,917 रुपये प्रति 10 ग्रॅमवर सोने बंद झाले होते. आज चांदीच्या दरातही 975 रुपयांची वाढ झाली. चांदी  58,400 रुपये प्रति किलोवर बंद झाली आहे. शुक्रवारी चांदी 57,425 रुपयांवर बंद झाली होती. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात किंचित घट झाली. सोने 1,752 डॉलर प्रति औंस होते. तर चांदी 22.16 डॉलर प्रति औंस होते. वर्षाच्या अखेरीस सोने नवीन रेकॉर्ड करू शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सोन्याचा दर हा 1950 ते 2000 डॉलर प्रति औंस जाऊ शकतो, असा अंदाज व्यक करण्यात आला आहे. अमेरिकेची अर्थविषयक माहिती आणि महागाईची चिंता सोन्याच्या किंमतीवर प्रभाव पाडेल असे या तज्ज्ञांचे मत आहे. शेअर बाजारात देखील मोठी घसरण झाली तर गुंतवणूकदार सोन्यात आणि चांदीमध्ये गुंतवणूक करतील असे मत आहे.  

टॅग्स :सोनं