Gold Rate Today, 31 March 2021: लग्न सराईचा मोसम सुरू झाला आहे आणि सोन्याच्या दरात सातत्यानं घसरण होताना पाहायला मिळत आहे. आज सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्चेंजवर (MCX) सोन्याच्या दरात ०.३ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली असून ४४ हजार ३०० रुपये इतका सोन्याचा दर झाला आहे. चांदीच्या दरातही ०.८ टक्क्यांची घट झाली असून एककिलो चांदीचा भाव ६२ हजार ६१७ रुपये इतका झाला आहे.
दिल्ल्याच्या सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४३ हजार ३०० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेटसाठी हाच दर ४४ हजार ३०० रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षभरातील सर्वात कमी दर नोंदविण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात ०.१ टक्क्यांनी घसरले आहेत.
देशातील महत्वाच्या शहरांमधील सोन्याचे दर काय?
मुंबई आणि पुण्यात २२ कॅरेट सोन्याचा दर ४३ हजार ६२० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेटसाठी ४४ हजार ६२० रुपये मोजावे लागणार आहेत. केरळमध्ये सर्वात कमी म्हणजेच २२ कॅरेटसाठी ४१ हजार ३५० रुपये, तर २४ कॅरेटसाठी ४२ हजार ३५० रुपये इतका दर आहे.