नवी दिल्ली : वायदा बाजारात सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.
एमजीएक्स एक्सचेंजवर सोमवारी सकाळी 10.20 च्या सुमारास ऑक्टोबर वायद्याच्या सोन्याचे दर 0.14 टक्क्यांनी म्हणजेच 69 रुपयांनी घसरत 49 हजार 600 रुपये प्रति 10 ग्रॅम दिसून आले. याशिवाय डिसेंबर वायदा बाजारात सोन्याचे दर सध्या एमसीएक्सवर 0.13 टक्क्यांनी म्हणजेच 63 रुपयांनी घसरत 49,585 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.
दुसरीकडे, सोमवारी सकाळी चांदीच्या वायदा बाजारातील किमतींमध्ये सुद्धा घसरण झाली. सोमवारी सकाळी 10.35 वाजता एमसीएक्सवर डिसेंबरचा चांदीचा भाव 0.75 टक्के म्हणजे 444 रुपये घसरून 58 हजार 583 रुपये प्रतिकिलो दिसून आला. याशिवाय चांदीच्या जागतिक वायदे बाजारातही घसरण दिसून आली.
जागतिक बाजारात सोन्याचे दरजागतिक स्तरावर सोन्याच्या किमतींबद्दल बोलायचे झाल्यास, ब्लूमबर्गच्या मते, सोमवारी सकाळी सोन्याचे जागतिक वायदा बाजारातील दर 0.08 टक्क्यांनी म्हणजे 1.40 डॉलरने घसरून 1,864.90 डॉलर प्रति औंस झाले.तसेच, सोन्याची जागतिक पातळीवरील किंमत सध्या प्रति औंस 1,861.11 डॉलर प्रति डॉलर आहे.
जागतिक बाजारात चांदीचे दरब्लूमबर्गच्या मते, सोमवारी सकाळी, कॉमेक्सवरील चांदीचा जागतिक भाव 0.40 टक्क्यांनी म्हणजेच 0.09 डॉलर खाली घसरून 23 डॉलर प्रति औंस झाला. त्याचबरोबर चांदीच्या जागतिक बाजारभावातील किंमत 22.89 डॉलर प्रति औंस ट्रेंड होत आहे.
आणखी बातम्या...
- India-China standoff: भारताकडून लडाखमध्ये टी-९० आणि टी-७२ टँक तैनात; चीनला शिकवणार धडा
- Amazon चा सर्वात मोठा Great Indian Festival सेल; 70 टक्क्यांपर्यंत सवलत अन् आकर्षक ऑफर्स
- CoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा
- सर्वात जुना घटक पक्ष एनडीएमधून बाहेर; भाजपा-अकाली दलाची २३ वर्षांची होती युती
- "हिमालयात सर्व नियमांचे पालन केले, तरीही मला कोरोनाची लागण झाली"