सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आज सोन्याच्या किंमतीने विक्रमी पातळी गाठली आहे. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा दराने 61,000 रुपयांचा टप्पाही ओलांडला. याच बरोबर, आज चांदीच्या दरातही 1800 रुपयांहून अधिक वाढ झाल्याचे दिसून आले. सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या किमतींनी बाजारात नवीन विक्रमी पातळी गाठली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने (HDFC Securities) याबाबत माहिती दिली आहे.
सोन्याच्या किमतीचा नवा विक्रम -
दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याची किंमत 1,025 रुपयांनी वाढून 61,080 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 60,055 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. याशिवाय चांदीचा भावही 1,810 रुपयांनी वाढून 73,950 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
ग्लोबल मार्केटमध्ये अशी आहे सोन्याची स्थिती? -
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 2,027 डॉलर प्रति औंस, तर चांदीचा भाव 24.04 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. कोमेक्सवरील सोन्याच्या किमती बुधवारी आशियातील व्यापाराच्या सत्रात तेजी आली आहे. यात मार्च 2022 नंतर, 1.80 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे.
'24 कॅरेट गोल्ड असते सर्वात शुद्ध -
खरे तर 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध सोने मानले जाते. शुद्ध सोने अथवा 24 कॅरेट सोने हे 99.9 टक्के शुद्धत असते. त्यात इतर कुठलाही धातू मिसळलेला नसतो. सोन्याची नाणी आणि बार तयार करण्यासाठी 24 कॅरेट सोन्याचा वापर होतो. सोन्याची शुद्धता ही 24 कॅरेटच्या तुलनेत मोजली जाते.