Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Price Today Fall: आज सोन्या, चांदीचा दर घसरला; झटपट जाणून घ्या...

Gold Price Today Fall: आज सोन्या, चांदीचा दर घसरला; झटपट जाणून घ्या...

Gold Price Today Fall: कोरोना काळात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. तेव्हाच्या आकड्यापेक्षा सध्याचा सोन्याचा दर हा जवळपास 9000 रुपयांनी स्वस्त आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 08:21 PM2021-12-15T20:21:56+5:302021-12-15T20:22:15+5:30

Gold Price Today Fall: कोरोना काळात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. तेव्हाच्या आकड्यापेक्षा सध्याचा सोन्याचा दर हा जवळपास 9000 रुपयांनी स्वस्त आहे.

Gold Price Today Fall: Gold, silver rates fell today; Find out instantly ... | Gold Price Today Fall: आज सोन्या, चांदीचा दर घसरला; झटपट जाणून घ्या...

Gold Price Today Fall: आज सोन्या, चांदीचा दर घसरला; झटपट जाणून घ्या...

आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमतींमध्ये काही दिवसांपासून घसरण सुरु आहे. याचा परिणाम भारतातील सोन्या चांदीच्या दरांवर दिसत आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी सोने (Gold price today) 297 रुपयांनी घसरले. यामुळे सोन्याचा आजचा दर हा 47,316 रुपये प्रति ग्रॅमवर बंद झाला. चांदीच्या दरातही मोठी घट पहायला मिळाली. 

चांदी आज 556 रुपयांनी घसरली. प्रति किलोला चांदीचा आजचा दर 59,569 रुपये प्रति किलोवर बंद झाला. मंगळवारी हा दर 60,125 प्रति किलो होता. सोमवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने 68 रुपयांनी कमी झाले होते. एचडीएफसी सिक्युरिटीने याची माहिती दिली. चांदीच्या किंमतीतही 114 रुपयांची घट झाली होती. परंतू आजची घसरण ही त्याहून खूप जास्त आहे. 

कोरोना काळात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. तेव्हाच्या आकड्यापेक्षा सध्याचा सोन्याचा दर हा जवळपास 9000 रुपयांनी स्वस्त आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोने 56,200 रुपये प्रति तोळा होते. आता सोने 47,019 रुपये प्रति तोळा आहे. सोन्याने गेल्या वर्षी 28 टक्के परतावा दिला आहे. त्याच्या आधीच्या वर्षी सोन्याने 25 टक्के रिटर्न दिला होता. कोरोना काळात गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली होती. 

तुमच्याकडचे सोने खरे आही की बनावट तपासता येते...
आपल्या देशात चार प्रकारचे सोने मिळते. पहिला प्रकार शुद्ध सोने म्हणजेच 24 कॅरेट, याचे दागिने बनविता येत नाहीत. अन्य तीन प्रकारातून दागिने बनविले जातात. त्यापैकी एका प्रकारातून लोकांना 'बनविले' जाते. तुम्ही सोन्याच्या बाजारातील दरानेच सोने खरेदी करता. शुद्ध सोन्यासाठी जेवढे पैसे मोजता तेवढेच अशुद्ध सोन्यासाठी देखील मोजता. जर तुमची फसवणूक टाळायची असेल तर तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांतील शुद्धता ओळखता आली पाहिजे.

How To Test Gold Purity At Home: तुमच्याकडचे सोने अस्सल आहे हे कसे चेक कराल? या 5 सोप्या टेस्ट ठरवतील शुद्धता
 

Web Title: Gold Price Today Fall: Gold, silver rates fell today; Find out instantly ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं