Join us

सोन्याचे भाव गडगडले, चांदीच्या दरातही मोठी कपात, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 4:18 PM

बाजार सुरू होण्याच्या दुस-याच दिवशी चांदीच्या भावात दीड हजारांनी  घसरण झाली व चांदी ४८ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर आली. 

नवी दिल्लीः अनलॉक -१मधील दुस-या टप्प्यात सुवर्णबाजार सुरू होताच ५० हजारावर पोहोचलेल्या चांदीच्या भावात दुस-याच दिवशी दीड हजार रुपये प्रति किलोने, तर सोन्यामध्ये ६०० रुपयांच्या जवळपास प्रतितोळ्याने घसरण झाली. त्यामुळे चांदी ४८ हजार ५०० रुपये, तर सोने ४६ हजार ५०० रुपयांवर आले आहे. लॉकडाऊनमुळे बंद असलेला सुवर्णबाजार ५ जून रोजी सुरू झाला. लॉकडाऊन ते अनलॉक या अडीच महिन्याच्या कालावधीत चांदीचे भाव ११ हजार रुपये प्रति किलोने वाढून ते ३९ हजार रुपयांवरून ५० हजार रुपयांवर पोहोचले. विदेशातून आवक नसल्याने व सुवर्णबाजारही बंद असल्याने बाजारपेठेत सोने येत नव्हते. त्यामुळे सोने-चांदीची चणचण निर्माण होऊन त्यांचे भाव वाढले. त्यामुळे लॉकडाऊननंतर सुवर्णबाजार उघडताच चांदीला चांगलीच चकाकी आली व ती थेट ५० हजारावर पोहोचली होती. 

सोन्याचेही भाव अशाच प्रकारे वाढून ते ४७ हजार ३०० रुपयांवर पोहोचले. चांदी थेट ५० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली असली तरी बाजार सुरू झाल्याने मोडच्या माध्यमातून बाजारात चांदीची उपलब्धतता होईल, वाढलेले हे भाव कमी होतील, असे संकेत सुवर्ण व्यावसायिकांनी दिले होते. त्यानुसार बाजार सुरू होण्याच्या दुस-याच दिवशी चांदीच्या भावात दीड हजारांनी  घसरण झाली व चांदी ४८ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर आली. 

अशाच प्रकारे ५ जून रोजी ४७ हजार ३०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात ८०० रुपयांनी घसरण होऊन ते ४६ हजार ५०० रुपयांवर आले. सुवर्णबाजारात सोने-चांदीची आवक सुरू होण्यासह अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात सुधारणा झाली. ५ जून रोजी ७५.६५ रुपये असलेल्या डॉलरचे दर ६ रोजी ७५.५६ रुपयांवर आले. ९ पैशांनी रुपयात सुधारणा झाल्यानेही सोने-चांदीचे भाव कमी होण्यास मदत झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

हेही वाचा

चीनला मात द्यायची असल्यास त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, बाबा रामदेव यांचं आवाहन

गर्भवती हत्तिणीच्या मृत्यूप्रकरणी केलेल्या विधानावरून मनेका गांधींविरोधात FIR दाखल

Coronavirus : भीषण वास्तव! लॉकडाऊनमुळे गमावली नोकरी, पदवीधर असूनही तरुणांना करावी लागतेय मजुरी

पंतप्रधानांना हटवलं पाहिजे, असं मी कधी म्हणाले का?, ममतांचा भाजपावर पलटवार

...तर भारताला मर्यादित युद्ध लढावेच लागेल, राहुल गांधींनी शेअर केला 'पनाग'चा लेख 

टॅग्स :सोनं