Join us

Gold Price Today 18-10-24 : धनत्रयोदशीपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी; पाहा काय आहेत नवे दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 1:56 PM

Gold-Silver Price Today: धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा तेजी दिसून येत आहे. दिवाळीपूर्वी सोन्याच्या मागणीतही वाढ दिसून येत आहे.

Gold-Silver Price Today: धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या (Gold Price in India) दरात पुन्हा एकदा तेजी दिसून येत आहे. दिवाळीपूर्वी सोन्याच्या मागणीतही वाढ दिसून येत आहे. त्यामुळेच सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या दरासोबतच चांदीच्या दरातही चढ-उतार पाहायला मिळत आहे. पाहूया २२ कॅरेट आणि २४ कॅरेट (Gold Price Today 22 and 24 Carat) सोन्याचे काय आहेत नवे दर.

देशातील सोन्याच्या किंमतींनी सलग दुसऱ्या दिवशी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७८,००० (10 Gram Gold Rates) रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. मात्र, एवढ्या चढ्या किमतींमुळे आगामी सणासुदीत सोन्याच्या मागणीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागणी असली तरी त्याचं प्रमाण कमी होऊ शकते, असे सराफांचं म्हणणं आहे.

दिल्लीत आज सोन्या-चांदीचे दर

आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७८,२९३.0 रुपये प्रति १० ग्रॅम आहे. गुरुवारच्या तुलनेत यात २२०.० रुपयांची वाढ झालीये. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव २०० रुपयांनी वाढलाय. तर दुसरीकडे आज दिल्लीत चांदीचा भाव १,००,००० रुपये प्रति किलो होता.

एमसीएक्सवर सोन्याचे दर काय?

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याच्या दरात (Today Gold Rate) पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवर आज सोन्याचा भाव ७७२९४ रुपये प्रति १० ग्रॅम वर खुला झाला. त्यानंतर काही वेळानं ५ डिसेंबरच्या डिलिव्हरीचं सोनं (Latest Gold Rate In India) ०.६२ टक्के म्हणजेच ४८१ रुपयांच्या वाढीसह ७७,५८८ रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेड करत आहे.

एमसीएक्सवर चांदीचा दर काय?

चांदीबद्दल बोलायचं झालं तर आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदी ९१,९९५ रुपये प्रति किलोवर उघडली. त्यानंतर डिसेंबर डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव (Today Silver Rate) १.२ टक्के म्हणजेच १०९७ रुपयांनी वाढून ९२,८४१ रुपये प्रति किलो झाला.

टॅग्स :सोनंचांदी