Gold Price Today, 30 March 2021: सोन्याच्या दरातील घसरण आजही कायम राहिली आहे. Good Returns वेबसाईटच्या माहितीनुसार सोन्याचा मंगळवारचा लेटेस्ट दर प्रति १० ग्रॅम ४२ हजार ९७० रुपये इतका आहे. तर MCX वर एप्रिलसाठीच्या दरात ०.३३ टक्क्यांची घसरण दाखवत असून १० ग्रॅमसाठी ४४ हजार ५५० रुपये इतका झाला आहे. दुसरीकडे चांदीच्या दरातही ०.४६ टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे. चांदीचा दर प्रतिकिलो ६३ हजार ८८० रुपये इतका झाला आहे. (Gold Price Today Gold Became Cheaper After Holi Here Are The Latest Rates)
२२ कॅरेट सोन्याच्या दरात १०० रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४३ हजार ९७० रुपये इतका नोंदविण्यात आला आहे. अर्थात देशातील राज्यांचे विविध कर रचनेवरुन सोन्याच्या दरात बदल होऊ शकतात.
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा दर काय?मुंबई आणि पुण्यात २२ कॅरेट सोन्याचा दर ४२ हजार ९८० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४३ हजार ९८० रुपये इतका आहे. बंगळुरू आणि हैदराबादमध्ये सोन्याचा सर्वात कमी दर नोंदविण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी २२ कॅरेट सोन्याचा दर ४१ हजार ७०० रुपये, तर २४ कॅरेटसाठी ४५ हजार ४९० रुपये इतका दर आहे.