सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोमवारी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत बदल झाला आहे. आज, 12 डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. दहा ग्रॅम सोने 54,461 रुपये झाले आहे. एक किलो चांदीचा दर वाढला असून, आता चांदी 68,503 रुपयांवर आले आहे.
दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव 109 रुपयांनी घसरून 54,461 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 54,570 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
१० दिवसात १०० टक्क्यांनी वाढले 'या' कंपनीचे शेअर, १०० रुपयांच्या डिव्हिडंटचा परिणाम
चांदी 934 रुपयांच्या वाढीसह 68,503 रुपये प्रति किलोवर बंद झाली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत देशातील सोन्याची आयात 17.38 टक्क्यांनी घसरून 24 अब्ज डॉलरवर आली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत सोन्याची आयात 9 डॉलर अब्ज होती.
गेल्या आठवड्यात देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली होती. अमेरिकेत महागाई कमी झाली आहे.काही दिवसापूर्वी MCX वर सोने 53700 वर होते. तर चांदी 66500 वर होते.