Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याची वायदा बाजारातील किंमत कमी झाली; जाणून घ्या...

सोन्याची वायदा बाजारातील किंमत कमी झाली; जाणून घ्या...

4 डिसेंबर 2020साठीचे सोन्याचे वायदा बाजारातील भाव सोमवारी सकाळी 0.14 टक्क्यांनी म्हणजे 68 रुपयांनी घसरले आणि ते प्रति 10 ग्रॅम 49,094 रुपयांवर आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 11:26 AM2020-07-20T11:26:14+5:302020-07-20T13:48:04+5:30

4 डिसेंबर 2020साठीचे सोन्याचे वायदा बाजारातील भाव सोमवारी सकाळी 0.14 टक्क्यांनी म्हणजे 68 रुपयांनी घसरले आणि ते प्रति 10 ग्रॅम 49,094 रुपयांवर आले.

gold price today gold futures price fall silver futures price also slips know prices | सोन्याची वायदा बाजारातील किंमत कमी झाली; जाणून घ्या...

सोन्याची वायदा बाजारातील किंमत कमी झाली; जाणून घ्या...

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोने-चांदीच्या वायदा बाजारातल्या किमतीमध्ये घसरण झाली आहे. एमसीएक्स एक्सचेंजवर सोमवारी पहाटे 5 ऑगस्ट रोजी 2020साठीच्या सोन्याचे वायदा बाजाराचे दर 0.18 टक्क्यांनी म्हणजे 88 रुपयांनी घसरून 48,879 रुपयांवर पोहोचले आहेत. त्याशिवाय सोमवारी सकाळी 5 ऑक्टोबर 2020साठीच्या सोन्याचे वायदा बाजारातील दर 0.24 टक्क्यांनी म्हणजेच 117 रुपयांनी घसरले आणि ते प्रति 10 ग्रॅम 48,990 रुपयांवर गेले आहेत. त्याचबरोबर 4 डिसेंबर 2020साठीचे सोन्याचे वायदा बाजारातील भाव सोमवारी सकाळी 0.14 टक्क्यांनी म्हणजे 68 रुपयांनी घसरले आणि ते प्रति 10 ग्रॅम 49,094 रुपयांवर आले.

सोन्यासह चांदीच्या देशांतर्गत वायदा बाजाराचे भावही सोमवारी सकाळी घसरले. सोमवारी सकाळी एमसीएक्सचा चांदीचा वायदाचा भाव 0.15 टक्क्यांनी म्हणजेच 81 रुपयांनी घसरून 52,818 रुपये प्रतिकिलो राहिला. सोमवारी सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या वायदा आणि स्पॉटच्या किमती दोन्हीमध्ये घसरण दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी सकाळी सोन्याचे वायदा आणि स्पॉट भाव या दोन्ही बाजारामध्ये घसरण झाली. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सोन्याचे वायदा 0.03 टक्क्यांनी म्हणजेच 0.60 डॉलर घसरून ते प्रति औंस 1809.40 पर्यंत घसरले. त्याचबरोबर सोमवारी सकाळी सोन्याची जागतिक किंमत 0.10 टक्क्यांनी म्हणजेच 1.90 डॉलरने घसरून 1808.52 डॉलर प्रति औंसवर आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव
सोन्याप्रमाणेच जागतिक वायदा आणि जागतिक स्पॉट या दोन्ही किमतींमध्येही सोमवारी सकाळी घट नोंदली गेली. सोमवारी सकाळी चांदीचा जागतिक भाव 0.32 टक्क्यांनी खाली म्हणजेच 0.06 डॉलरच्या घसरणीसह 19.70 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करतो आहे. त्याचबरोबर चांदीची जागतिक किंमत 0.10 टक्क्यांनी म्हणजेच 0.02 डॉलरनं घसरून प्रति औंस 19.31 डॉलरवर ट्रेंड करतेय.

हेही वाचा

भारतीय लष्कराची तयारी पाहून चीन बिथरला; तिबेटमध्ये बनवलं थेट 'उडतं हॉस्पिटल'

"सत्तेसाठी मोदी ताकदवान नेता असल्याची खोटी प्रतिमा पसरवली; आता तीच ठरतेय भारताची दुर्बलता"

सोन्याचे भाव पुन्हा एकदा झाले कमी, असे आहेत आजचे दर

ग्रामीण बँकांमध्ये 9638 पदांसाठी नोकऱ्यांची खैरात! उद्या संपणार मुदत, असा करा अर्ज

सरकारच्या 'या' योजनेत पाच वर्षांसाठी १ लाख गुंतवल्यावर मिळतोय मोठा लाभ, पैसेही राहणार सुरक्षित

Web Title: gold price today gold futures price fall silver futures price also slips know prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं