Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Price Today: सोन्याचा भाव आज पुन्हा गडगडला, आंतरराष्‍ट्रीय बाजारातही घसरण; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

Gold Price Today: सोन्याचा भाव आज पुन्हा गडगडला, आंतरराष्‍ट्रीय बाजारातही घसरण; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

मल्‍टी कमोडिटी एक्‍सचेन्जवर (MCX) आज सोन्याचा दर (Gold Price Today) 0.01 टक्क्यांनी घसरला आहे. तर चांदीचा (Silver price Today) दर आज 0.38 टक्क्यांनी वाढला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 02:16 PM2022-11-18T14:16:45+5:302022-11-18T14:17:32+5:30

मल्‍टी कमोडिटी एक्‍सचेन्जवर (MCX) आज सोन्याचा दर (Gold Price Today) 0.01 टक्क्यांनी घसरला आहे. तर चांदीचा (Silver price Today) दर आज 0.38 टक्क्यांनी वाढला आहे.

Gold Price Today Gold price tumbled again today, fall in international market too Check the latest rate | Gold Price Today: सोन्याचा भाव आज पुन्हा गडगडला, आंतरराष्‍ट्रीय बाजारातही घसरण; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

प्रतिकात्मक फोटो.

भारतीय वायदा बाजारात आज आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण दिसून आली आहे. याशिवाय, आंतरराष्‍ट्रीय बाजारातही आज सोन्या-चांदीचे दर गडगडले आहेत. तसेच, मल्‍टी कमोडिटी एक्‍सचेन्जवर (MCX) आज सोन्याचा दर (Gold Price Today) 0.01 टक्क्यांनी घसरला आहे. तर चांदीचा (Silver price Today) दर आज 0.38 टक्क्यांनी वाढला आहे.

आज काय आहे सोन्या-चांदीचा भाव? -
मल्‍टी कमोडिटी एक्‍सचेन्जवर आज शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा दर सकाळी 9 :10 वाजेपर्यंत 5 रुपयांच्या सामान्य घसरणीसह 52,838 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता. तर चांदीचा दर 233 रुपयांनी वाढून 61,211 रुपयांवर ट्रेड करत आहे. 

महत्वाचे म्हणजे, आज सोन्याचा भाव 52,843 रुपयांवर ओपन झाला होता. मात्र, यानंतर हा भाव 52,838 रुपयांवर आला. तर चांदीचा दर 62,290 रुपयांवर ओपन झाला होता, जो नंतर, 62,770 रुपयांपर्यंत गेला. मात्र, यानंतर भाव थोडा कमी होऊन 61,211 रुपयांवर आला. अर्थात आज बाजारात काही प्रमाणावर सुस्ती दिसत आहे.

आंतरराष्‍ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचा दर - 
आंतरराष्ट्रीय बाजारावर नजर टाकली असता, सोने आणि चांदी च्या दरात घसरण दिसून येते. येथे सोन्याची स्पॉट किंमत आज 0.67 टक्क्यांनी घसरून 1,762.02 डॉलर प्रति औंसवर आली आहे. तसेच, आंतरराष्‍ट्रीय बाजारात चांदीचा दर आज 1.54 टक्क्यांनी कमी होऊन 21.09 डॉलर प्रति औंस वर आला आहे. काल चांदीचा दर 1.36  टक्क्यांनी घसरला होता.

Web Title: Gold Price Today Gold price tumbled again today, fall in international market too Check the latest rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.