Join us  

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! आज पुन्हा वाढले दर, चेक करा आजचे भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 12:36 PM

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सध्या लग्नाचे हंगाम सुरू आहे.

Gold Price Today : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सध्या लग्नाचे सीझन सुरू आहे, त्यामुळे सोनं, चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचा भाव ५५,७०० रुपयांवर आहे, चांदीच्या किंमती ६८,६०० रुपयांवर आहे. 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव ०.१३ टक्क्यांच्या वाढीसह ५५,७८४ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. आज सोन्याचा भाव५५,८ ०० रुपयांवर आहे. मागच्या सत्रातील ट्रेडिंगमध्ये हा दर १७४ रुपयांनी घसरला आणि ५५,६९० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला.

याशिवाय एमसीएक्सवर चांदीच्या किंमतीही वाढल्या आहेत. आज चांदी ०.४२ टक्क्यांसह ६८,३५५ रुपये प्रति किलो ग्रॅमवर बंद झाला. 

आंतरराष्‍ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ होत आहे. सोन्याची किंमत ०.३२ टक्क्यांनी वाढून १,८७६.७४ डॉलर प्रति औंस झाली आहे. दुसरीकडे, चांदीच्या किमती ०.०५ टक्क्यांची घसरण झाली असून, त्यानंतर चांदीची किंमत २३.६५ डॉलर प्रति औंस झाली आहे.

Ashneer Grover यांच्या स्टार्टमध्ये नोकरीची संधी, ५ वर्षे थांबणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार मर्सिडिज

या वर्षाच्या सुरुवातीलाच सानं, चांदीच्या दराने उसळी घेतली होती. देशात सोनं, चांदी खरेदी करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. सध्या देशात लग्नाचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे सोनं, चांदीची मागणी मोठ्या प्रमाणात असते. या पार्श्वभूमिवर सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे आता सर्वसामान्यांना झटका बसणार आहे. 

टॅग्स :सोनंचांदी