Join us  

Gold Price : सोन्याच्या दरात उसळी, पुन्हा नव्या रेकॉर्डकडे वाटचाल! जाणून घ्या, आजचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 4:40 PM

भारतीय बाजारात आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरात उतार चढाव दिसत असतानाच, ग्‍लोबल मार्केटमधील स्थिती अत्यंत वेगळी आहे.

 

सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ दिसून आली आहे. जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत असतानाही, भारतीय वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात फआरसा बदल झाल्याचे दिसत नाही. आज सोन्याच्या किंमतीत अल्पशी वाढ झाली. तर चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसू आले आहे. 

सोन्या-चांदीचा आजचा दर - मल्‍टीकमोडिटी एक्‍सचेन्जवर (MCX) आज सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा वादा बाजारातील दर 2 रुपयांनी वाढून 50,781 रुपये प्रती 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर, एमसीएक्‍सवर चांदीचा वायदा दर 170 रुपयांनी घसरून 56,961 रुपये प्रती किलोग्रॅमवर आली आहे. यापूर्वी सोन्याचे ट्रेडिंग 50,709 रुपयाना सुरू झाले होती. तर चांदीच्या ट्रेडिंगची सुरूवात 57,069 रुपयांनी झाली होती. 

ग्‍लोबल मार्केटमध्ये सोन्या-चांदीचा दर - भारतीय बाजारात आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरात उतार चढाव दिसत असतानाच, ग्‍लोबल मार्केटमधील स्थिती अत्यंत वेगळी आहे. येथे सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसत आहे. तर चांदीच्या दरांनी उसळीघेतल्याचे दिसत आहे. अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत आज 1,740.52 डॉलर प्रती औंस होती, ही किंमत मागील बंद झालेल्या दराच्या तुलनेत 1.38 टक्क्यांनी कमी आहे. तर, चांदीची स्पॉट किंमत 19.19 डॉलर प्रति औंस आहे. जी मागच्या बंद भावाच्या तुलनेत 0.03 टक्के अधिक आहे. 

टॅग्स :सोनंचांदीव्यवसायबाजार