Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

स्थानिक वायदा बाजारात बुधवारी सकाळी चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 01:11 PM2020-09-30T13:11:02+5:302020-09-30T13:11:30+5:30

स्थानिक वायदा बाजारात बुधवारी सकाळी चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली.

Gold Price Today: Gold-Silver prices fall sharply, find out today's prices | Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या वायदा बाजारातील किमतींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. एमसीएक्स एक्सचेंजवर बुधवारी सकाळी नऊ वाजून दोन मिनिटांनी डिसेंबरच्या वायदा बाजारात सोन्याचा भाव 266 रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम 50,386 रुपयांवर आला. याशिवाय, बुधवारी सकाळी नऊ वाजून 56 मिनिटांनी एमसीएक्सवर ऑक्टोबरच्या वायदा बाजारात सोन्याचा भाव 231 रुपयांनी घसरून प्रति दहा ग्रॅम 50,450 रुपये होता. तसेच, बुधवारी सकाळी जागतिक वायदा आणि सोन्याच्या स्पॉट किमतींमध्ये घसरण दिसून आली.

दुसरीकडे, स्थानिक वायदा बाजारात बुधवारी सकाळी चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली. एमसीएक्स एक्सचेंजच्या डिसेंबर वायदा बाजारात चांदीचा भाव बुधवारी सकाळी ९ वाजून ५३ मिनिटांवर 1,396   रुपयांची घट होऊन प्रति किलो 61,070 रुपये ट्रेंड करत होता. तसेच, जागतिक पातळीवर चांदीच्या वायदा आणि स्पॉटच्या किंमतींमध्ये सुद्धा घसरण दिसून आली.

जागतिक बाजारात सोन्याचे दर
जागतिक पातळीवर सोन्याचे वायदे आणि स्पॉट दोन्ही किंमतीत घसरण झाली. ब्लूमबर्गच्या मते, बुधवारी सकाळी सोन्याचे जागतिक वायदा बाजारातील दर 0.36  टक्क्यांनी म्हणजे 6.90 डॉलरने घसरून  1,896.30  डॉलर प्रति औंस झाले. याशिवाय, सोन्याचा जागतिक स्पॉट किंमतीत सध्या 0.40 टक्के म्हणजेच 6.90 डॉलरची घट होऊन प्रति 1,896.30 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करताना दिसून आला. 

जागतिक बाजारात चांदीचे दर
ब्लूमबर्गच्या मते, बुधवारी सकाळी, कॉमेक्सवरील चांदीचा जागतिक वायदा भाव 1.90 टक्क्यांनी म्हणजेच 0.46 डॉलर खाली घसरून 23.98 डॉलर प्रति औंस झाला. त्याचबरोबर, चांदीच्या जागतिक स्पॉट बाजारातील किंमत 23.91 डॉलर प्रति औंस ट्रेंड होत आहे.
 

Web Title: Gold Price Today: Gold-Silver prices fall sharply, find out today's prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.