कोरोना काळात वाढलेले सोने आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. आता तर नवविवाहितही होणाऱ्या पत्नीला सोन्याचे दागिने करायचे की नाही या टेन्शनमध्ये आहेत. एकीकडे अदानींनी शेअर बाजाराला सुरुंग लावलेला असताना आता सोन्याचे दरही गडगडू लागले आहेत.
जागतिक बाजारातील घसरणीमुळे भारतीय सर्राफा बाजारातही सोन्या चांदीच्या दरात घट झाली. दहा ग्रॅम सोने स्वस्त होऊन 57,155 रुपयांवर बंद झाले. दुसरीकडे एक किलो चांदीच्या दरातही घसरण झाली. चांदी आज 68,133 रुपयांवर बंद झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.
दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोने 574 रुपयांच्या घसरणीसह 57,155 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 57,729 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्याचप्रमाणे चांदीचा भावही 2,113 रुपयांनी घसरून 68,133 रुपये प्रति किलोवर बंद झाला. परदेशी बाजारात सोन्याचा भाव 1,875 डॉलर प्रति औंस झाला, तर चांदीचा भाव 22.48 डॉलर प्रति औंस झाल होता.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने जारी केलेल्या सोन्याच्या दरानुसार आज संध्याकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव 57455 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. मागील व्यवहाराच्या दिवशी सोने 57788 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाले होते.