नवी दिल्ली : लॉकडाऊन - ४ नंतर अनलॉक -१मधील दुस-या टप्प्यात सुवर्णबाजार सुरू झाल्यापासून सोन्याच्या भावात वाढ सुरूच असून, बुधवार, १७ जून रोजी सोन्याचे भाव ४८ हजारांवर पोहोचले. ९ जून रोजी ४६,८०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात आठवडाभरात १२०० रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीचे भावही एकाच दिवसात एक हजार रुपयांनी वाढून ती पुन्हा ४९ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. विदेशातून आवक कमी व अमेरिकन डॉलरचे वाढलेले दर यामुळे ही भाववाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
लॉकडाऊनमुळे बंद असलेला सुवर्णबाजार ५ जून रोजी सुरू झाला. लॉकडाऊन ते अनलॉक या अडीच महिन्यांच्या कालावधीत चांदीचे भाव ११ हजार रुपये प्रति किलोने वाढून ते ३९ हजार रुपयांवरून ५० हजार रुपयांवर पोहोचले. विदेशातून आवक नसल्याने व सुवर्णबाजारही बंद असल्याने बाजारपेठेत मोड येत नव्हती. त्यामुळे सोने-चांदीची चणचण निर्माण होऊन त्यांचे भाव वाढले. त्यामुळे लॉकडाऊननंतर सुवर्णबाजार उघडताच चांदीला चांगलीच चकाकी आली व ती थेट ५० हजारांवर पोहोचली. सोन्याचेही भाव अशाच प्रकारे वाढून ते ४७ हजार ३०० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर ६ जून रोजी केवळ एक दिवस सोन्याच्या भावात ८०० रुपयांनी घसरण झाली होती. मात्र त्यानंतर हे भाव दररोज वाढत गेले.
सोमवार ८ रोजी सोन्याच्या भावात २०० व मंगळवारी आणखी १०० रुपयांनी वाढ होऊन ते ४६ हजार ८०० रुपयांवर पोहोचले. दोन दिवसांत सोन्यात ३०० रुपये प्रतितोळ्याने वाढ झाली होती. ९ जून रोजी ४६,८०० रुपयांवर असलेलं सोने ११ रोजी ४७,२००, १५ जून रोजी ४७,८०० रुपयावर पोहचले. त्यानंतर आता बुधवार, १७ जून रोजी सोन्याने ४८ हजार रुपयांचा टप्पा गाठला.
चांदीत एक हजारांनी वाढ
चांदीच्या भावात तसा चढ उतार सुरू आहे. ५ जून रोजी ५० हजार, ६ रोजी ४८,५००, ९ रोजी ४९,००० असे भाव कमी जास्त होत आहे. त्यानतर १५ जून रोजी एक हजाराने घसरण होऊन ४८ हजारावर आलेल्या चांदीचे भाव १६ रोजी याच भावावर स्थिर होती. मात्र १७ रोजी त्यात पुन्हा थेट एक हजाराने ती ४९ हजार रुपये प्रति किलो वर पोहोचली आहे.
हेही वाचा
India China Faceoff: भारत-चीन सैन्यातील हिंसक झटापटीनंतर पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
India China Faceoff: मोदीजी बाहेर या, कुठे लपून बसला आहात?, राहुल गांधींचा हल्लाबोल
CoronaVirus News : आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन द्या, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
CoronaVirus News: "अखेर सत्य पुढे आलेच"; कोरोनाबळींचा आकडा वाढला, फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला!
CoronaVirus: डॉक्टरांच्या लढ्याला मोठं यश! 'या' औषधानं व्हेंटिलेटरवरचे रुग्णही झाले ठणठणीत