सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत आहेत. जगभरात सुरू असलेलं कोरोनाचं लसीकरण आणि अमेरिकेतील सत्तांतरण ही यामागची मुख्य कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती बदलल्याचा परिणाम भारतातील बाजारावरही दिसून येतो. सोन्याच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही.
Good Returns वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम (१ तोळं) सोन्यासाठी ४८,३३० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्यासाठी हाच दर ४९,३३० रुपये इतका आहे. तर चांदीचा भाव प्रतिकिलो ६६,७०० रुपये इतका आहे.
दरम्यान, याच आठवड्यात २३ जानेवारीला सोन्याच्या दरात २३० रुपयांची मोठी घट नोंदविण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी सोन्याच्या दरानं पुन्हा उसळी घेतली होती.
देशातील प्रमुख शहरांमधील २२ कॅरेट सोन्याचा दरमुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमसाठी ४८,३३० रुपये इतका दर आहे. देशाची राजधानी दिल्लीत ४८,०९० रुपये, चेन्नईत ४६,३६० रुपये इतका दर आहे. बंगळुरू, हैदराबाद, केरळमध्ये सर्वात कमी म्हणजेच ४५,९४० रुपये इतका दर नोंदविण्यात आला आहे.