रुपयाची घसरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली वाढ यामुळे आज दिल्ली (Delhi) सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत (Gold Price Hike) वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत सोने १४४ रुपयांनी महागले. सोन्याची किंमत 48167 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाली. त्याचवेळी चांदीच्या दरात 76 रुपयांची किंचित घसरण नोंदवण्यात आली. चांदी 61607 रुपये प्रति किलोवर बंद झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव सध्या 1818 डॉलरच्या पातळीवर तर चांदीचा भाव 22.88 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता. डॉलर इंडेक्सममध्ये 0.13 टक्क्यांची तेजी दिसत असून तो 95.51 वर आहे. हा निर्देशांक जगातील सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद किंवा कमकुवतपणा दर्शवितो.
कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि जागतिक बाजारात अमेरिकन चलन मजबूत झाल्यामुळे मंगळवारी रुपया डॉलरच्या तुलनेत पाच पैशांनी घसरून 74.74 (अस्थायी) झाला. अखेरीस, मागील कामकाजाच्या दिवशी बंद पातळीच्या तुलनेत रुपया पाच पैशांनी घसरून प्रति डॉलर 74.74 वर बंद झाला. शुक्रवारी शेवटच्या व्यापार सत्रात रुपया प्रति डॉलर 74.69 वर बंद झाला होता.
सोन्याचे दर घसरणीसह 48225 रुपयांवर व्यवहार करत होता. सोन्याच्या जून डिलिव्हरीचा भाव 11 रुपयांनी वाढून 48385 रुपयांवर पोहोचला. चांदीबद्दल बोलायचे झाले तर त्यात घसरण पाहायला मिळत आहे. यावेळी मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 337 रुपयांनी घसरून 61698 रुपयांवर, तर मे डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 275 रुपयांनी घसरून 62523 रुपयांवर ट्रेड करत होता.