Join us  

Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात जोरदार घसरण, 1244 रुपयांनी चांदी स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 7:26 PM

आनंदाची बातमी, सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण...!

उद्या शुक्रवारी 4 ऑक्टोबरला देवउठनी एकादशी (Devuthani ekadashi) आहे. देवउठनी एकादशीपासून मंगल कार्यांना प्रारंभ होतो. यातच विवाहांच्या पार्श्वभूमीवर बाजारात सोने-चांदीची मागणी वाढते. जर आपणही सोने आणि  चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल,  तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

किती स्वस्त झालं सोनं-चांदी -एचडीएफसी एनएसई सिक्योरिटीजनुसार, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत गुरुवारी सोन्याचा दर (Gold price today) 402 रुपयांनी कमी होऊन 50,597 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. गेल्या व्यवहारात सोन्याचा दर 50,999 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तसेच, चांदीही (Silver price today) 1,244 रुपयांनी कोसळून 58,111 रुपये प्रति किलो ग्रॅमवर आली आहे.

एक्सपर्ट म्हणतात... -आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 1,628.7 डॉलर प्रति औंस एवढा होता. तर चांदी 19.15 डॉलर प्रति औंसवर बंद झाली. "फेडरल रिझर्व्ह चेअर पॉवेलने दिलेल्या संकेतांनुसार, केंद्रीय बँक छोट्या दरांत वाढ लागू करणे सुरू करेल. यामुळे कॉमेक्स सोन्याचे दरही घसरले आहेत," असे एचडीएफसी सिक्योरिटीजचे रिसर्च अॅनालिस्ट दिलीप परमार यांनी म्हटले आहे.

टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूकबाजार