Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Price Today : सोन्याचे दर 9000 रुपयांनी घसरले, चांदीचे दर वाढले, जाणून घ्या आजचे नवे दर…

Gold Price Today : सोन्याचे दर 9000 रुपयांनी घसरले, चांदीचे दर वाढले, जाणून घ्या आजचे नवे दर…

Gold Price Today : सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जून वायदा सोन्याच्या किंमती 270 रुपयांनी वाढून 47,007 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 11:44 AM2021-05-03T11:44:26+5:302021-05-03T11:45:40+5:30

Gold Price Today : सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जून वायदा सोन्याच्या किंमती 270 रुपयांनी वाढून 47,007 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहेत.

gold price today up but still down 9000 rupees from record high silver also jumps on 3 may 2021 | Gold Price Today : सोन्याचे दर 9000 रुपयांनी घसरले, चांदीचे दर वाढले, जाणून घ्या आजचे नवे दर…

Gold Price Today : सोन्याचे दर 9000 रुपयांनी घसरले, चांदीचे दर वाढले, जाणून घ्या आजचे नवे दर…

Highlights'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार घसरणीनंतर भारतीय बाजारात आज सोन्याच्या (Gold Price Today) आणि चांदीच्या किंमतीत (Silver Price Today) तेजी दिसून आली. एमसीएक्सवर सोन्याची तेजी आहे. आज सोन्याच्या दरात 0.6 टक्क्यांनी वाढ होऊन 47004 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर, चांदी 0.6 टक्क्यांनी वाढून 68,789 रुपये प्रति किलो झाली आहे. दरम्यान, रेकॉर्ड पातळीवर सोन्याच्या किंमतींमध्ये 9000 रुपयांची घसरण झाल्याचे दिसून येत आहे. (gold price today up but still down 9000 rupees from record high silver also jumps on 3 may 2021)

आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास, याठिकाणी सोन्याचे दर सपाट पातळीवर व्यवहार करीत आहेत. स्पॉट सोने 1,770.66 डॉलर प्रति औंसवर ड्रेड करत होते, तर चांदी 25.90 डॉलर स्थिर प्रति औंसवर स्थिर आहे.

सोन्याची किंमत (Gold Price) - सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जून वायदा सोन्याच्या किंमती 270 रुपयांनी वाढून 47,007 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहेत.

चांदीच्या किंमत (Silver Price) - एमसीएक्सवर मे वायदा चांदीच्या किंमती 401 रुपयांनी वाढून 67,925 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहेत. स्पॉट मार्केटमध्ये चांदीची किंमत 25.90 डॉलर प्रति औंस आहे. 

कशाप्रकारे ओळखायची सोन्याची शुद्धता?
जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

कसा ठरतो सोन्याचा भाव?
डॉलरची किंमत दिवसेंदिवस वाढत जात आहे, त्यामुळे सोन्याच्या भावाने ४५ हजारांचा टप्पा कधीच पार केला आहे, तर दुसरीकडे कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. अशा परिस्थितीत लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला आहे. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात  मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात  ठरवण्यात आला.


आता सोन्याचा भाव लंडनमध्ये ठरवला जातो. जगातले १५ बँकर्स(बँका) एकत्र येऊन सोन्याचा भाव ठरवतात. या १५ बँकांमध्ये मॉर्गन स्टॅनली, एचएसबीसी, नोव्हा स्कॉटिया, स्टँडर्ड चार्टर्ड अशी काही प्रसिद्ध नावे आहेत. इतर दोन बँका चिनी आहेत. बँक ऑफ चायना आणि इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना अशी नावे आहेत. सोन्याचा भाव ठरवण्यात आयजीबेए म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचा महत्त्वाचा हिस्सा असतो. या संघटनेचे सभासद भारतातील मोठे व्यापारी असतात. खरेदी आणि विक्री असे दोन दर असतात त्या दरांची सरासरी काढून सोन्याचा भाव ठरवला जातो. सोने आपल्या बँका परदेशी बँकांकडून खरेदी करतात. त्याच्यावर त्यांचे सर्व्हिस चार्जेस लागतात आणि डिलर्सना विकतात. त्यानंतर डिलर्स ते सोन्याचे व्यापारी आणि दुकानदारांना विकतात. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय भाव आणि भारतातल्या भावात तफावत आढळून येते.

Web Title: gold price today up but still down 9000 rupees from record high silver also jumps on 3 may 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.