नवी दिल्ली - देशात सोन्याच्या दरात सोमवारी मोठी घसरण दिसून आली. भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचा दर गेल्या एक आठवड्यापासून वधारलेलाच दिसत होता. मात्र, आठवड्याच्या पहिल्याच व्यवसायिक दिवसाची सुरुवात सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीने झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेन्जनुसार, सोने 48,076 रुपये प्रती 10 ग्रॅमवर आहे. तर चांदी 0.4 टक्क्यांच्या घसरणीसह म्हणजेच 274 रुपयांच्या घसरणीसह 68045 रुपये प्रती किलो ग्रॅमवर आहे. यापूर्वीच्या सत्रात सोन्याच्या दरात 400 रुपये प्रती 10 ग्रॅमची घसरण नोंदवण्यात आली होती.
देशातील महत्वांच्या शहरातील सोन्याचा दर -
- मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा दर 47,190 रुपये प्रती 10 ग्रॅम आणि 24-कॅरेट सोन्याचा दर 48,190 रुपये प्रती 10 ग्रॅम होता.
- चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचा दर 45,410 रुपये प्रती 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 49,540 रुपये प्रती 10 ग्रॅम आहे.
- दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 47,400 रुपये प्रती 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 51,700 रुपये प्रती 10 ग्रॅम आहे.
- कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याचा दर 47,020 रुपये प्रती 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 48,460 रुपये प्रती 10 ग्रॅम आहे.
- बेंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर कीमत 44,990 रुपये प्रती 10 ग्रॅम आणि 24 कॅरेटचा दर 49,000 रुपये प्रती 10 ग्रॅम आहे.
- हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 44,990 रुपये प्रती 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 49,000 रुपये प्रती 10 ग्रॅम आहे.
- केरळमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा दर 44,990 रुपये प्रती 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 49,000 रुपये प्रती 10 ग्रॅम आहे.
- पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा दर 47,190 रुपये प्रती 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 48,190 रुपये प्रती 10 ग्रॅम आहे.
- अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,490 रुपये प्रती 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 49,490 रुपये प्रती 10 ग्रॅम आहे.
- उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये 22 कॅरेट सोनेचा दर 47,400 रुपये प्रती 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,700 रुपये प्रती 10 ग्रॅम आहे.
12 कोटी लोकांसाठी खूशखबर! ऑगस्ट महिन्यात जमा होणार 'इतकी' रक्कम; जाणून घ्या, सविस्तर...
कसा ठरतो सोन्याचा दर? -कोरोना काळात लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला आहे. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.
लंडनमध्ये ठरवला जातो सोन्याचा दर - आता सोन्याचा भाव लंडनमध्ये ठरवला जातो. जगातले १५ बँकर्स(बँका) एकत्र येऊन सोन्याचा भाव ठरवतात. या १५ बँकांमध्ये मॉर्गन स्टॅनली, एचएसबीसी, नोव्हा स्कॉटिया, स्टँडर्ड चार्टर्ड अशी काही प्रसिद्ध नावे आहेत. इतर दोन बँका चिनी आहेत. बँक ऑफ चायना आणि इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना, अशी त्यांची नावे आहेत.
सोन्याचा भाव ठरवण्यात आयजीबेए म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचा महत्त्वाचा हिस्सा असतो. या संघटनेचे सभासद भारतातील मोठे व्यापारी असतात. खरेदी आणि विक्री, असे दोन दर असतात त्या दरांची सरासरी काढून सोन्याचा भाव ठरवला जातो. सोने आपल्या बँका परदेशी बँकांकडून खरेदी करतात. त्याच्यावर त्यांचे सर्व्हिस चार्जेस लागतात आणि डिलर्सना विकतात. त्यानंतर डिलर्स ते सोन्याचे व्यापारी आणि दुकानदारांना विकतात. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय भाव आणि भारतातल्या भावात तफावत आढळून येते.