Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Price Today: ज्याची भीती होती, तेच घडणार! सोने कोरोना काळातील उच्चांकापेक्षा काही रुपये खाली; जाणून घ्या दर...

Gold Price Today: ज्याची भीती होती, तेच घडणार! सोने कोरोना काळातील उच्चांकापेक्षा काही रुपये खाली; जाणून घ्या दर...

Gold Price Hike: कोरोना काळात 56,200 रुपयांवर सोने गेले होते. आज चांदीमध्ये देखील वाढ पहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 10:50 AM2023-01-09T10:50:41+5:302023-01-09T10:52:03+5:30

Gold Price Hike: कोरोना काळात 56,200 रुपयांवर सोने गेले होते. आज चांदीमध्ये देखील वाढ पहायला मिळाली.

Gold Price Today: What was feared, will happen! Gold a few rupees below Corona-era highs; Know the rates... | Gold Price Today: ज्याची भीती होती, तेच घडणार! सोने कोरोना काळातील उच्चांकापेक्षा काही रुपये खाली; जाणून घ्या दर...

Gold Price Today: ज्याची भीती होती, तेच घडणार! सोने कोरोना काळातील उच्चांकापेक्षा काही रुपये खाली; जाणून घ्या दर...

सोन्याने पुन्हा एकदा सामान्यांना घाम फोडण्यास सुरुवात केली आहे. सोन्याने प्रति १० ग्रामचा सर्वकालिन उच्चांकी दराचा उंबरठा ओलांडण्यास सुरुवात केली आहे. आज सोन्याचा दर 56,071 वर गेला आहे. 

आज भारतीय वायदे बाजारात सोन्याची किंमत 56 हजार रुपयांवर गेली आहे. कोरोना काळात 56,200 रुपयांवर सोने गेले होते. त्या रेकॉर्डपासून सोने १२९ रुपये दूर आहे. आज चांदीमध्ये देखील वाढ पहायला मिळाली. सोमवारी ९ जानेवारीला मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा दर 0.59 टक्के वाढला होता. तर चांदीचा दर 0.62 टक्क्यांनी वाढला आहे. 

शुक्रवारी सोन्याचा दर एमसीएक्सवर 0.80 टक्के वाढला होता, तर चांदीचा दर 1.62 टक्क्यांनी वाढला होता. फ्युचर्स मार्केटमध्ये 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर साडेनऊपर्यंत 328 रुपयांनी वाढून 56,071 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. आज सोन्याचा भाव रु.55,800 वर उघडला. गेल्या ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर सोन्याचा भाव 440 रुपयांनी वाढून 55,730 रुपयांवर बंद झाला होता. 

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज चांदीचा दर 4311 रुपयांनी वाढून 69,586 रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर चांदीचा भाव 1,100 रुपयांनी वाढून 69,178 रुपयांवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे आणि चांदीचे दर वाढले आहेत. सोन्याचा भाव आज 0.63 टक्क्यांनी वाढून $1,877.59 प्रति औंसवर गेला. चांदीचा भाव 0.62 टक्क्यांनी वाढून 23.98 डॉलर प्रति औंसवर गेला आहे. 

Web Title: Gold Price Today: What was feared, will happen! Gold a few rupees below Corona-era highs; Know the rates...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं