Join us

५०० रुपयांच्या वाढीने सोने ७४,२०० रुपयांवर; चांदी पोहचली थेट ८५ हजारांवर 

By विजय.सैतवाल | Updated: April 17, 2024 17:50 IST

१७ एप्रिल रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ते ७४ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले

जळगाव : सोन्याच्या भावात बुधवार, १७ एप्रिल रोजी ५०० रुपयांची वाढ होऊन ते ७४ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. चांदीच्या भावात तर एकाच दिवसात एक हजार ७०० रुपयांची वाढ होऊन ती ८५ हजार रुपये प्रति किलो अशा उच्चांकी भावावर पोहचली आहे. 

गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठी वाढ सुरू आहे. मंगळवार, १६ एप्रिल रोजी ९०० रुपयांची वाढ झालेल्या सोन्याच्या भावात बुधवार, १७ एप्रिल रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ते ७४ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. मंगळवारी २०० रुपयांची घसरण झालेल्या चांदीच्या भावात बुधवारी एक हजार ७०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ती थेट ८५ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली. 

सोने-चांदीसाठी मोजा एवढी रक्कमधातू-मूळ किंमत-जीएसटीसहसोने- ७४,२००-७६,४२६चांदी - ८५,००० - ८७,५५०

टॅग्स :सोनं