Join us

सोन्याचा भाव ४२५ रुपयांनी उसळला

By admin | Published: August 12, 2015 2:08 AM

अखेर दोन आठवड्यांनंतर मंगळवारी सोन्याने २५ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. गेले दोन आठवडे सोने घसरत गेले होते. जागतिक बाजारात सोन्याने पकड घेताच त्याचा भाव वाढला.

मुंबई : अखेर दोन आठवड्यांनंतर मंगळवारी सोन्याने २५ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. गेले दोन आठवडे सोने घसरत गेले होते. जागतिक बाजारात सोन्याने पकड घेताच त्याचा भाव वाढला.स्टॅडर्ड सोने (९९.९ शुद्धतेचे) १० गॅ्रममागे ४२५ रुपयांनी वधारून २५,२५० रुपये झाले. सोमवारी व्यवहार बंद झाले तेव्हा त्याचा भाव २४,८२५ रुपये होता. शुद्ध सोनेही (९९.९ शुद्धतेचे) १० ग्रॅममागे २५,४०० रुपये झाले.आदल्या दिवशी ते २४,९७५ रुपये होता. चांदीला (.९९९ शुद्धते) औद्योगिक क्षेत्रातून मागणी वाढताच ती किलोमागे ९०० रुपयांनी वधारून ३५,७४० रुपये झाली.