जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची मागणी वाढल्याने दोन दिवसांत सोन्याच्या भावात ९०० रुपये वाढ झाली आहे. सोन्याचा भाव ३३ हजार ३०० रुपयांवरून ३४,२०० वर पोहोचला आहे. अनेक वर्षांनंतर एकाच वेळी झालेली ही मोठी वाढ ठरली आहे. चांदीच्या दरातही वाढ होऊन ती ३९ हजार रुपये प्रती किलोवर गेली आहे.सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी, तसेच अमेरिकन डॉलरचा मोठा परिणाम होतो. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सुधारत गेला की, सोन्याचे भाव कमी होतात. गेल्या आठवड्यापासून रुपयात सुधारणा होत असतानाही सोन्याचे भाव वाढत गेले. अमेरिका व इंग्लंडमध्ये सोन्याचे भाव वाढल्याने त्याचा हा परिणाम आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दलाल सक्रीय झाल्याने कृत्रिम मागणी वाढली व सोन्याला झळाली आल्याचे जाणकारांनी सांगितले.
सोन्याची झळाळी वाढली; दोनच दिवसांत तब्बल ९०० रुपयांनी वधारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 4:49 AM