Join us  

सोन्याचा भाव ६५ हजार रुपयांवर जाणार? आठवडाभरात अडीच हजारांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 9:25 AM

सोन्याच्या भावात पुढील दिवसांत मोठी वाढ होत ते ६५ हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली/जळगाव: अमेरिका-युरोपमधील बँकिंग संकट आणि शेअर बाजारातील उलथापालथ यामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. त्यामुळे जागतिक बाजाराबरोबरच एमसीएक्स आणि देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याची चमक आणखी वाढली आहे. गेल्या आठवडाभरात तर सोन्याच्या भावात २ हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे. चांदीदेखील आठवडाभरात ५ हजार २०० रुपयांनी वधारून ती ६७ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. सोन्याच्या भावात पुढील दिवसांत मोठी वाढ होत ते ६५ हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

चांदीतही पाच हजार रुपयांची वाढ

गेल्या महिन्यात ५६ ते ५७ हजार रुपयांदरम्यान असलेले सोन्याचे भाव शुक्रवारी जळगावमध्ये ५८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत. चांदीदेखील आठवडाभरात ५ हजार २०० रुपयांनी वधारून ती ६७ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

का वाढेल भाव? 

बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे सोन्याला मागणी वाढत आहे. यामुळे या वर्षाखेरीस सोन्याचा दर ६५ हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

गेल्या महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भाव कमी-कमी होत गेले. आता जागतिक अस्थिरतेमुळे भाववाढ होऊ लागली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :सोनं