नवी दिल्ली : सलग चार दिवसांपासून होत असलेल्या घसरणीमुळे सराफा बाजारात सोन्याचा भाव २५ हजार रुपयांवर आला. सोन्याच्या भावातील हा चार वर्षांतील नीचांक होय. जगातील प्रमुख सराफा बाजारात तर सोन्याचा भाव पाच वर्षांतील नीचांक पातळीवर आला आहे. सोने घसरत असताना चांदी मात्र चांगलीच झळाळली.
दागदागिने तयार करणारे व्यावसायिक आणि किरकोळ व्यापारी घसरणीचा रोख पाहून खरेदीपासून दूर राहिले. त्यामुळे सराफा बाजारात मंदी पसरली. दिल्ली सराफा बाजारात ४० रुपयांची घसरण होत सोन्याचा भाव २४,९८० रुपयांवर (प्रति दहा ग्रॅम) आला. ६ आॅगस्ट २०११ नंतरचीही लक्षणीय घट होय. गेल्या तीन वर्षांत सोन्याचा भाव २८० रुपयांनी कमी झाला. चांदीचा भाव मात्र १०० रुपयांनी वाढत ३३,८०० रुपयांवर (प्रति किलो) गेला.
जागतिक बाजारातही घसरण
अमेरिकी फेडरल रिझर्व्ह धोरणात्मक दरात वाढ करण्याची शक्यता असल्याने जगातील प्रमुख सराफा बाजारात सोन्याचा भाव पाच वर्षांतील नीचांक पातळीवर आला आहे. दुसरीकडे डॉलर मजबूत झाल्याने गुंतवणुकीसाठी सोन्याचा पर्यायाकडे गुंतवणुकदार डोळेझाक करीत आहेत. त्याचा परिणाम दिल्ली सराफा बाजारावर दिसून
आला.
पुुढे आणखी घट होण्याची शक्यता असल्याने दागदागिने तयार करणारे व्यावसायिक आणि किरकोळ व्यापाऱ्यांकडून मागणीत जोर नव्हता. सिंगापूरमध्ये सोन्याचा भाव पाच वर्षांतील नीचांक गाठत प्रति औंस १,०८५.०८ डॉलरवर आला.
सोन्याचा भाव २५ हजारांखाली
सलग चार दिवसांपासून होत असलेल्या घसरणीमुळे सराफा बाजारात सोन्याचा भाव २५ हजार रुपयांवर आला. सोन्याच्या भावातील हा चार वर्षांतील नीचांक होय
By admin | Published: August 6, 2015 10:33 PM2015-08-06T22:33:45+5:302015-08-06T22:33:45+5:30