Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Price : सोन्याच्या दरात घसरण सुरूच, आजही स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या किंमत

Gold Price : सोन्याच्या दरात घसरण सुरूच, आजही स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या किंमत

सोन्याच्या दरात गुरुवारीही घट झाल्याचे बघायला मिळाले. गुरूवारी सोन्याचे दर 320 रुपयांनी घसरले. यानंतर सोनं 45,867 रुपये प्रती 10 ग्रॅमवर आले होते. बुधवारीही सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आणि ते 46,187 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले होते. यापूर्वी मंगळवारी सोने 46,819 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. (Gold prices continue to fall)

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 05:55 PM2021-02-19T17:55:42+5:302021-02-19T17:55:53+5:30

सोन्याच्या दरात गुरुवारीही घट झाल्याचे बघायला मिळाले. गुरूवारी सोन्याचे दर 320 रुपयांनी घसरले. यानंतर सोनं 45,867 रुपये प्रती 10 ग्रॅमवर आले होते. बुधवारीही सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आणि ते 46,187 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले होते. यापूर्वी मंगळवारी सोने 46,819 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. (Gold prices continue to fall)

Gold prices continue to fall know what is the price today | Gold Price : सोन्याच्या दरात घसरण सुरूच, आजही स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या किंमत

Gold Price : सोन्याच्या दरात घसरण सुरूच, आजही स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली - आपण सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सध्या सोन्याचा दर मोठ्या प्रमाणावर घसरलेला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याची ही चांगली वेळ ठरू शकते. कमी झालेल्या स्पॉट मागणीमुळे व्यापाऱ्यांनी आपल्या सौद्यात घट केला. यामुळे वायदा बाजारात शुक्रवारी सोन्याचा दर (Gold price) 0.27 टक्क्यांनी घसरून 46,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. (Gold prices continue to fall know what is the price today)

मल्टी कमोडिटी एक्सचेन्जमध्ये एप्रिल महिन्यात डिलिव्हरी असलेल्या सोन्याच्या वायद्याची किंमत 126 रुपये अर्थात 0.27 टक्के कमी होऊन 46,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. यात 13,987 लॉटसाठी व्यवहार झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या दरात 0.24 टक्क्यांची घसरण झाली. यामुळे तेथे सोन्याचा दर 1,770.70 डॉलर प्रति औंस सुरू आहे.

8 महिन्यात सोने सर्वात स्वस्त...! पण, विकत घेण्याची ही योग्य वेळ आहे का?

गुरुवारी सोन्यात 0.51 टक्क्यांची घसरण -
सोन्याच्या दरात गुरुवारीही घट झाल्याचे बघायला मिळाले. गुरूवारी सोन्याचे दर 320 रुपयांनी घसरले. यानंतर सोनं 45,867 रुपये प्रती 10 ग्रॅमवर आले होते. बुधवारीही सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आणि ते 46,187 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले होते. यापूर्वी मंगळवारी सोने 46,819 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते.

कसा ठरतो सोन्याचा दर? 
कोरोना काळात लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला आहे. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.

लाॅकडाउनमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक दागिन्यांची खरेदी

लंडनमध्ये ठरवला जातो सोन्याचा भाव -
आता सोन्याचा भाव लंडनमध्ये ठरवला जातो. जगातले १५ बँकर्स(बँका) एकत्र येऊन सोन्याचा भाव ठरवतात. या १५ बँकांमध्ये मॉर्गन स्टॅनली, एचएसबीसी, नोव्हा स्कॉटिया, स्टँडर्ड चार्टर्ड अशी काही प्रसिद्ध नावे आहेत. इतर दोन बँका चिनी आहेत. बँक ऑफ चायना आणि इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना अशी नावे आहेत. सोन्याचा भाव ठरवण्यात आयजीबेए म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचा महत्त्वाचा हिस्सा असतो. या संघटनेचे सभासद भारतातील मोठे व्यापारी असतात. खरेदी आणि विक्री, असे दोन दर असतात त्या दरांची सरासरी काढून सोन्याचा भाव ठरवला जातो. सोने आपल्या बँका परदेशी बँकांकडून खरेदी करतात. त्याच्यावर त्यांचे सर्व्हिस चार्जेस लागतात आणि डिलर्सना विकतात. त्यानंतर डिलर्स ते सोन्याचे व्यापारी आणि दुकानदारांना विकतात. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय भाव आणि भारतातल्या भावात तफावत आढळून येते.

Web Title: Gold prices continue to fall know what is the price today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.