नवी दिल्ली : जागतिक बाजारात मंगळवारी सोने स्थिर राहिले; मात्र स्थानिक बाजारात मागणीअभावी ते दहा ग्रॅममध्ये ३५ रुपयांनी घसरून २६,३५0 रुपये झाले. औद्योगिक प्रकल्प आणि नाणे उत्पादकांकडून तुरळक मागणी झाल्यामुळे चांदीही ३४ हजार रुपये किलो अशी स्थिर राहिली.सोने सोमवारी १६५ रुपयांनी घसरले होते. आज मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला उठाव नव्हता. त्याचा परिणाम स्थानिक बाजारावर होऊन सराफा आणि व्यापारी यांच्यावर झाला. त्यांच्याकडून खरेदी झाली नाही. परिणामत: सोन्यावर दडपण आले.जागतिक बाजारात सिंगापूर येथे सोन्याचे भाव १,0८८.६८ अमेरिकी डॉलर प्रति औंस असे स्थिर राहिले. दरम्यान, सोमवारी केंद्र सरकारने सोन्याच्या आयातीचे शुल्क वाढवून ३५४ अमेरिकी डॉलर प्रति १0 ग्रॅम, तर चांदीच्या आयातीचे शुल्क वाढवून ४५७ अमेरिकी डॉलर प्रति किलो इतके केले. चालू महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सोन्याचे आयात शुल्क ३४५ अमेरिकी डॉलर प्रति १0 ग्रॅम, तर चांदीचे आयात शुल्क ४५२ अमेरिकी डॉलर प्रति किलो होते. चांदीचे कारखाने आणि नाणे निर्मात्यांकडून कमी मागणी असल्याने चांदीचे भाव स्थिर राहिल्याने नाण्यांच्या भावावर काहीही परिणाम झाला नाही.
मागणीअभावी सोन्याचा भाव उतरला
By admin | Published: January 20, 2016 3:10 AM